दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय दोन्ही संघांना विजयाची सुवर्णसंधी आहे. या सामन्यात देखील भारतीय कर्णधार पुन्हा एकदा शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात बाद होऊन माघारी परतल्यानंतर त्याने दिलेल्या रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.( Virat Kohli reaction)
विराट कोहलीने जेव्हापासून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तेव्हापासून पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे, जिथे एक शतक झळकावण्यासाठी त्याला २ वर्ष वाट पाहावी लागली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो ३५ आणि १८ धावा करत माघारी परतला आहे. तो दोन्ही डावात चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. परंतु, दोन्ही वेळेस तो बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला.
विराट दुसऱ्या डावात ज्या प्रकारे बाद झाला त्यामुळे तो अजिबात खूश नव्हता. ड्रेसिंग रूममध्ये दुसऱ्या डावात बाद झाल्याचे पाहून विराटच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता.
He will start 2022 with hundred @imVkohli ❤ pic.twitter.com/oOe6tFm2Gi
— 𝙿𝚁𝙴𝙴𝚃 ♡ (@joblessguy_09) December 29, 2021
Virat Kohli is not happy with his dismissal when he watching. pic.twitter.com/0MHZkvFTSD
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 29, 2021
विराट कोहलीने दुसऱ्या डावात ३२ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी केली. ज्यामध्ये ४ चौकारांचा समावेश होता. तो या डावात तरी शतक पूर्ण करेल असे संकेत दिसुन येत होते. परंतु मार्को जेंसन (Marco Jansen) गोलंदाजीला आला आणि त्याने अप्रतिम चेंडू टाकत विराट कोहलीला क्विंटन डी कॉकच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले.
Marco Jansen bringing the magic on debut🤩 #SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/7cYIorUwsY
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 29, 2021
भारतीय संघाने दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी ३०५ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाच्या (२९ डिसेंबर) समाप्ती पर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने ४ बाद ९४ धावा केल्या आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला २११ धावांची आवश्यकता आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्याने आतापर्यंत एकूण ७० शतक झळकावले आहेत. ७१ वे शतक झळकावण्यासाठी त्याला भरपूर वाट पाहावी लागतेय. उर्वरित २ सामन्यात तो शतक पूर्ण करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
टीम इंडियासाठी ‘पुढील वरीस मोक्याच’! टी२० विश्वचषकासह खेळणार ‘या’ महत्वाच्या मालिका
नव्या आयसीसी क्रमवारीत अश्विनने उंचावला टीम इंडियाचा झेंडा; रोहित-विराट ‘या’ क्रमांकावर
हे नक्की पाहा :