रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तानमधील रोमांचक सामना पाहून सर्वांच्या डोळांचे पारणे फिटले. टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील हा चौथा सामना होता, जो भारातने चार विकेट्स राखून जिंकला. भारताला विजय मिळवून देण्यासाठी विराट कोहली सर्वात महत्वाच खेळाडू ठरला. त्याने या सामन्यात वादळी खेळी केली आणि विजय मिळवल्यानंतर तो इमोशनल झाल्याचे पाहायला मिळाले.
विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शेवटच्या षटकांमध्ये त्याने केलेल्या ताबडतोड खेळीच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवला. विराटने 53 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. त्याच्या साथीने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) देखील महत्वपूर्व खेळी करू शकला. हार्दिकने 37 चेंडूत 40 धावा केल्या. भारताला विजयासाठी मर्यादित 20 षटकांमध्ये 170 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव करून गाठले.
सामना संपल्यानंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील एक लाख प्रेक्षक विराटच्या नावाचा गजर करताना दिसले. स्टेडियममध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना विराट मात्र भावूक झाल्यासारखा दिसत होता. त्याचे डोळे पाणावल्याचे स्पष्टपणे दिसत होते. दरम्यान, विराट कोहली आशिया चषक 2022 नंतर त्याच्या जुन्या रंगात आल्याचे दिसत आहे. आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध विराटने जवळपास तीन वर्षांनंतर शतक केले होते. काही महिन्यांपूर्वी विराटच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या सर्व बाजूंनी जोरदार टीका केली जात होती. पण आता फॉर्ममध्ये परतल्यानंतर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
https://twitter.com/BodkheShilpa/status/1584154428344451073?s=20&t=KeKvwF6zvZzQz2zVESurkg
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दोन्ही संघांचा 2022 टी-20 विश्वचषकातील हा पहिलाच सामना होता. भारतीय संघाचा कर्णदार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग (तीन विकेट्स) आणि हार्दिक पंड्याच्या (तीन विकेट्स) भेदक गोलंदाजीनंतर देखील पाकिस्तानने 8 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावा केल्या. प्रत्युत्तरा भारतीय संघाची वरची फली स्वस्तात बाद झाली. पण विराट कोहली आणि हार्दिकच्या योगदानामुळे संघ 4 विकेट्स विजय मिळवून शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सव्याज परतफेड! विराटच्या ऐतिहासिक खेळीने मेलबर्नमध्ये पाकिस्तान चारीमुंड्या चित; विश्वचषकात विजयी सुरुवात
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल