टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात कोहली शून्यावर बाद झाला.
या सामन्यात विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र कोहलीनं पुन्हा एकदा निराश केलं. तो न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम ओरूर्कचा बॅक ऑफ लेन्थ चेंडू समजू शकला नाही. कोहलीला चेंडू फ्लिक करायचा होता, परंतु तो हवेत गेला, ज्यावर ग्लेन फिलिप्सनं पुढे डाइव्ह करून शानदार झेल घेतला.
विराट कोहलीची बॅट बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही शांतच राहिली होती. त्यानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. तर कानपूरमध्ये त्यानं पहिल्या डावात 47 आणि दुसऱ्या डावात नाबाद 29 धावा केल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. त्यानं डिसेंबर 2023 मध्ये शेवटचं अर्धशतक झळकावलं होतं. तेव्हा त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांची दमदार खेळी केली होती. कोहली 2024 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचा भाग नव्हता. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला केवळ 99 धावा करता आल्या होत्या. कोहलीला गेल्या 8 कसोटी डावात केवळ एकदाच अर्धशतक झळकावता आलं आहे.
विराट कोहली 2021 नंतर प्रथमच कसोटीत शून्यावर बाद झाला आहे. तो कसोटीच्या 32 डावांनंतर शून्यावर तंबूत परतला.
कसोटीत शून्यावर बाद होण्यापूर्वी विराट कोहलीनं खेळलेले सर्वाधिक चेंडू
11 विरुद्ध श्रीलंका, कोलकाता, 2017
9 विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, 2024
8 विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद, 2021
5 विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2021
हेही वाचा –
भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीतून शुबमन गिल बाहेर, धक्कादायक कारण जाणून घ्या
रिकी पाँटिंगनंतर हा भारतीय क्रिकेटपटू होणार दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक
केदार जाधवचा संघ LLC चॅम्पियन! इरफान पठाणच्या संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव