---Advertisement---

ऍराॅन फिंच म्हणतो विराट सर्वकालीन महान खेळाडू तर रोहित…

---Advertisement---

काल (19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात वनडे मालिकेतील अंतिम सामना पार पडला. हा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला असून मालिका 2-1ने जिंकली आहे.

हा सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍराॅन फिंचने (Aaron Finch) भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची (Rohit Sharma) प्रशंसा केली आहे.

विराट हा सर्वकालीन महान वनडे खेळाडू आहे तर, रोहित हा पहिल्या पाच महान फलंदाजांच्या यादीतील खेळाडू आहे, असे रविवारी झालेल्या वनडे सामन्यानंतर विराट आणि रोहितची प्रशंसा करताना फिंच म्हणाला.

“भारताकडे विराट आहे जो कदाचित सर्वकालीन महान खेळाडू आहे. तसेच रोहित हा असा खेळाडू आहे जो कदाचित पहिल्या पाच फलंदाजांच्या यादीत सामील होईल. हे दोन्हीही खेळाडू उत्कृष्ट आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाची ही विशेषता आहे की त्यांचे अनुभवी खेळाडू मोठ्या सामन्यांमध्ये आपली भूमिका चांगल्याप्रकारे पार पाडत आहेत,” असे सामन्यानंतर फिंच म्हणाला.

“रोहितने शतकी खेळी केली. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) दुखापतीमुळे भारतीय संघाला फलंदाजीत बदल करावा लागला. भारताच्या विराट आणि रोहित या अनुभवी खेळाडूंनी सर्वाधिक योगदान दिले. त्यामुळे समजते की भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजी किती मजबूत आहे,” असेही फिंच यावेळी म्हणाला.

या सामन्यात रोहितने 128 चेंडूत 119 धावांची शतकी खेळी केली. तर विराटने 91 चेंडूत 89 धावा केल्या. यावेळी फलंदाजी करताना या दोन्ही खेळाडूंनी 137 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---