भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज सध्या आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करत आहे. मग तो बॉर्डर गावसकर ट्रॉफी मधील तिसरा आणि चौथा कसोटी सामना असो किंवा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना. तो आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही त्याने अर्धशतक झळकावले आहे. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाच्या धावा ६ बाद ३०० होत्या. त्यानतंर दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या रिषभ पंत याने ५८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३२९ धावांपर्यंत मजल मारली.
विराट कोहलीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
रिषभ पंत आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. अशातच इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत फलंदाजी करत असताना, जो रूट याने टाकलेल्या चेंडूवर रिषभ पंत याने स्टँडमध्ये लांबच लांब षटकार मारला. तो षटकार पाहून कर्णधार विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रविवारी(१४ फेब्रुवारी) सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर विकेट पडायला सुरुवात झाली होती. अशातच इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट ९१ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभ पंत याने षटकार मारला. हा षटकार पाहून विराट देखील अवाक् झाला होता.
https://twitter.com/CowCorner9/status/1360825664169934848
भारतीय संघ आघाडीवर
पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर, रोहित शर्माच्या १६१ आणि अजिंक्य रहाणेच्या ६७ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानतंर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचे विकेट पडायला सुरुवात झाली होती. भारतीय संघाचा पहिला डाव ३२९ धावांवर आटोपला.
त्यानंतर इंग्लंड संघाकडून फलंदाजीसाठी आलेल्या रोरी बर्न्स याला ईशांत शर्माने शून्यावर बाद करत पहिला झटका दिला. मागील सामन्यात दुहेरी शतक झळकावनाऱ्या जो रूट याने अवघ्या ६ धावा केल्या. तर फोक्स याने नाबाद ४२ धावांची खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर उरकला. भारतीय संघाकडून आर. अश्विन याने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज याला एक विकेट मिळाली. तसेच ईशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या.
भारतीय संघाला पहिला झटका
दुसऱ्या डावात १९५ धावांनी पुढे असलेल्या भारतीय संघाने ४२ धावांवर पहिली विकेट गमवली. सलामीचा फलंदाज शुबमन गिल १४ धावा करत माघारी परतला. भारताने दुसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात १ बाद ५४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंचांच्या चूकीमुळे रोहित नाबाद? पंचांच्या निर्णायावर वैतागला रुट, पाहा व्हिडिओ