---Advertisement---

सलग ७ विजयांच्या पराक्रमानंतर विराटच्या नेतृत्वाखाली ४ पराभव, झाली नकोशा विक्रमाची नोंद

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 2:42 PM
---Advertisement---

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या भारताच्या पराभवामुळे विराट कोहलीच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आत्तापर्यंत ५७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ३३ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर १४ सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. यातील ४ पराभव भारताला विराटच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या मागील सलग ४ सामन्यात मिळाले आहेत. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखील सलग ४ सामन्यात पराभव स्विकारण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

विराटच्या नेतृत्वातील सलग ४ पराभव

भारताने २०२० च्या सुरुवातीला विराटच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन आणि ख्राईस्टचर्च यथे पराभव स्विकारला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडलेड येथे दिवस-रात्र कसोटीत भारताचा पराभव झाला. त्यानंतर लगेचच चेन्नई येथे मायदेशी खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सलग ७ विजयांनंतर ४ पराभव

विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली हे सगल ४ पराभव स्विकारण्याआधी भारताने सलग ७ सामन्यात विजय मिळवला होता. त्यावेळी विराट हा सलग ७ कसोटीत विजय मिळवणारा पहिलाच कर्णधार ठरला होता. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखालील भारताचा इतिहास पाहाता भारताने सलग ७ कसोटी विजयांनंतर सलग ४ पराभव स्विकारण्याची नकोशी गोष्ट घडली आहे.

चेन्नई कसोटीत पराभव – 

नुकत्याच पार पडलेल्या चेन्नई कसोटीत भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याआधी इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती.

यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर ४२० धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस  बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

गांगुली-धोनीसारख्या कर्णधारांना न जमलेला किर्तीमान कोहलीच्या नावावर, ठरला पहिलाच भारतीय कॅप्टन 

अंडरसनने उडवल्या एका षटकात २ भारतीयांच्या दांड्या अन् सर्वांना आठवली लक्ष्मण-गांगुलीची ‘ती’ विकेट

मानलं पाहिजे तुला भावा! वयाची तिशी पार केल्यानंतर अंडरसनने घेतल्यात ३००हून जास्त विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---