---Advertisement---

पुण्याच मैदान म्हटलं की हा खेळाडू १०० टक्के खेळतोच

On: बुधवार, ऑक्टोबर 9, 2019 3:30 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना उद्यापासून(10 ऑक्टोबर) पुण्यात सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे खेळवला जाईल.

आत्तापर्यंत गहुंजेच्या या स्टेडीयमवर 7 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. या सर्व 7 सामन्यात भारतीय संघ खेळला आहे. यामध्ये 4 वनडे, 2 टी20 आणि 1 कसोटी सामन्याचा समावेश आहे. मात्र भारताला या 7 सामन्यांपैकी केवळ 3 सामनेच या मैदानावर जिंकता आले आहेत.

असे असले तरी मात्र हे मैदान भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरले आहे. तो या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत 6 सामने या मैदानावर खेळताना 50.42 च्या सरासरीने 353 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे.

विराटने त्याची ही 2 शतके इंग्लंड विरुद्ध आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे सामन्यात केली आहेत. तसेच त्याने या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 अर्धशतकही केले आहे.

मात्र विराटची या मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात खराब कामगिरी झाली होती. त्याने या कसोटी सामन्यात दोन्ही डावात मिळून 13 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचा या मैदानावरील कसोटीतील कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल.

पण या एक कसोटीतील कामगिरी वगळता विराटची गहुंजेच्या या मैदानावरील एकूण कामगिरी चांगली झालेली आहे. त्यामुळे विराट उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटीत या मैदानवरील चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (आंतरराष्ट्रीय सामने)

353 धावा – विराट कोहली (6 सामने)

136 धावा – स्टिव्ह स्मिथ (1 सामना)

120 धावा – शिखर धवन (5 सामने)

120 धावा – केदार जाधव (2 सामने)

99 धावा – मॅट रेनशॉ (1 सामना)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment