---Advertisement---

अखेर प्रतिक्षा संपली! ‘किंग कोहली’चे 2 वर्ष आणि 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय शतक

On: गुरूवार, सप्टेंबर 8, 2022 8:58 PM
Virat Kohli
---Advertisement---

आशिया चषक 2022 मधील पाचवा सुपर फोर सामना भारत व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला.‌ या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. नियमित करणे धार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघासाठी विराट कोहली व केएल राहुल यांनी सलामी दिली. बऱ्याच कालावधीनंतर सलामीला उतरलेल्या विराट कोहली याने शानदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय टी20 मधील आपले पहिले पहिले शतक झळकावले. यासह नोव्हेंबर 2019 सुरू झालेला त्याचा आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ अखेर संपुष्टात आला.

विराटने या सामन्यात एकूण अवघ्या 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले. चाहते मागच्या 2 वर्ष आणि 10 महिन्यांपासून विराटच्या षटकाची प्रतिक्षा करत होते. अखेर अफगाणिस्तानविरुद्ध गुरुवारी (8 सप्टेंबर) त्यांची ही प्रतिक्षा संपली. विराटच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात मर्यादित 20 षटकांमध्ये 212 धावा उभ्या केल्या. सलामीसाठी विराटच्या जोडीने आलेला केएल राहुल देखील अर्धशतक करून परतला. राहुलने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव 2 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. रिषभ पंत (20*) विरासोबत शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

अखेर प्रतिक्षा संपली! ‘किंग कोहली’चे 2 वर्ष आणि 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय शतक
अरे हे गल्ली क्रिकेट आहे का? ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या खेळाडूंनी केली हास्यास्पद चूक; पाहा व्हिडिओ 
ICC Team Ranking | ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव न्यूझीलंडाला चांगलेच पडले महागात, ‘हा’ संघ बनला नंबर वन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---