२०१७मध्ये धरमशाला कसोटीत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्त्व केले होते. तसेच भारतीय संघाला शानदार विजयही मिळवुन दिला होता.
भारतीय संघ पुण्यात पहिला कसोटी सामना पराभूत झाला होता तर दुसरा सामना बेंगलोर येथे संघाने ७५ धावांनी जिंकला होता. तिसरा सामना रांची येथे अनिर्णित राहिला होता. यामुळे धरमशाला कसोटी सामन्याला वेगळेच महत्त्व आले होते.
दोनही संघाना कसोटी मालिका जिंकण्यासाठी विजय मिळवणे महत्त्वाचे होते. परंतु कसोटीच्या दोन दिवस आधी विराट फीट नसल्याचे वृत्त येत होते.
सामन्याच्या आदल्या सायंकाळी अजिंक्यला सांगण्यात आले होते, की त्याला उद्याच्या सामन्यात कर्णधार करण्यात येईल. यामुळे हा जरी आनंदाचा क्षण असला तरी अजिंक्य भलताच टेन्शनमध्ये आला होता.
कोहलीने तो फिट नसल्याने तू उद्याच्या सामन्यात कर्णधार असणार आहे, असे रहाणेला सांगितले होते. दुर्दैव म्हणजे या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक हारला व ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू भारतीय फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने दोनही डावांत नाग्या टाकल्या तसेच रहाणे व केएल राहुलने दोन्ही डावांत चांगली कामगिरी केली होती. भारतीय संघाने हा सामना तब्बल ८ विकेट्सने जिंकत मालिका २-१ने जिंकली होती.
त्यानंतर २०१८ला अजिंक्यने एका सामन्यात संघाचे नेतृत्त्व केले होते. तो सामनाही भारताने जिंकला होता.
धरमशाला कसोटीनंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी विजेतेपदाची गदा आयसीसी हॉल ऑफ द फेम सुनिल गावसकर यांच्या हस्ते देण्यात आली होती. तिचा स्विकार रहाणे व विराटने संयुक्तरित्या केला होता.