यंदाच्या आयपीएल हंगामाला उद्या म्हणजेच (22 मार्च) पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. हंगामातील पहिला सामना कोलकाता विरुद्ध बेंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी आपण आयपीएलमधील एका रेकाॅर्डबद्दल जाणून घेणार आहोत, जो फक्त एकट्याच फलंदाजाच्या नावे आहे. तो फलंदाज दुसरा कोणी नसून विराट कोहली आहे. रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएल इतिहासात 8000+ धावा करणार विराट कोहली हा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.
विराट कोहली हा 2008 पासून आरसीबी संघाचा भाग आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. 2024 च्या हंगामात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. आयपीएलमध्ये कोहलीच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो.
विराट कोहलीसाठी 2016 चा आयपीएल हंगाम सर्वांत संस्मरणीय राहिला. त्या हंगामात त्याने 973 धावा काढत एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. त्याने चार शतके झळकावत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते.
विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात अनेक विक्रम स्थापित केले आहेत. त्यापैकी हा एक विक्रम आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून कोहलीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी, कठोर मेहनत आणि मैदानावरील जिद्द पाहता त्याला “आयपीएलचा किंग” म्हणणे वावगे ठरणार नाही. कोहलीची कारकीर्द ही युवा क्रिकेटपटूंसाठी एक प्रेरणा आहे. त्याच्या यशाची ही गाथा भविष्यात आणखी मोठी होईल, यात शंका नाही.
विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 252 सामने खेळल्या आहेत, ज्यात त्याने 132 च्या स्ट्राईक रेटने 8004 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 8 शतके आणि 55 अर्धशतके केल्या आहेत.






