भारतीय संघाचा टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दारुण पराभव झाला. इंग्लंडकडून भारताला दहाच्या दहा विकेट्सने पराभूत व्हावे लागले. या विजयासोबतच इंग्लंडने अंतिम सामन्यातही धडक दिली. आता इंग्लंड संघ अंतिम सामन्यात पाकिस्तानला आव्हान देईल. असे असले, तरी भारतीय संघाचा दमदार फलंदाज विराट कोहली याने अशी कामगिरी केली, जी कोट्यवधी भारतीय कधीच विसरणार नाहीत. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
भारतावर इंग्लंडचे वर्चस्व
भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता 170 धावा चोपत पूर्ण केले. तसेच, दहा विकेट्सने सामना खिशात घातला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 168 धावा विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या अर्धशतकामुळे साकारल्या. विराटने 40 चेंडूत 50 धावा चोपल्या. यामध्ये 1 षटकार आणि 4 अर्धशतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे, हे विराटचे या विश्वचषकातील चौथे अर्धशतक होते. इंग्लंडविरुद्ध ठोकलेल्या या अर्धशतकासह विराटने या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचे आपले स्थान आणखी मजबूत केले.
Virat Kohli brings up a magnificent fifty but departs immediately!#INDvENG | 📝: https://t.co/HlaLdeP00a
Head to our app and website to follow the #T20WorldCup action 👉 https://t.co/wGiqb2eXqM pic.twitter.com/416dmIhmG2
— T20 World Cup (@T20WorldCup) November 10, 2022
विराट कोहलीची कामगिरी
विराटने या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 98.66च्या सरासरीने 296 धावा चोपल्या आहेत. या धावा त्याने 4 अर्धशतकाच्या मदतीने केल्या आहेत. यामध्ये नाबाद 82 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
विशेष म्हणजे, टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा चोपणारा आठवा खेळाडू ठरला. यापूर्वी त्याने अशी कामगिरी तीन वेळा केली होती. टी20 विश्वचषक 2007मध्ये भारतासाठी गौतम गंभीर याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 227 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2009च्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगने सर्वाधिक 153 धावा केल्या होत्या. 2010मध्ये सुरेश रैनाने 219 धावा कुटल्या होत्या. 2012मध्ये विराट कोहली याने सर्वाधिक 185 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2014 आणि 2016 टी20 विश्वचषकात विराटनेच सर्वाधिक धावा केल्या होत्या. 2014मध्ये त्याने 319 आणि 2016मध्ये 273 धावा चोपल्या होत्या.
यानंतर केएल राहुल याने 2021च्या टी20 विश्वचषकात 194 धावा चोपल्या होत्या. तसेच, 2022मध्ये 296 धावा चोपत विराटने पुन्हा एकदा या यादीत स्थान मिळवले. (Virat Kohli Leading Scorer for India in each T20 World Cup)
भारताकडून टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
2007- गौतम गंभीर (227 धावा)
2009- युवराज सिंग (153 धावा)
2010- सुरेश रैना (219 धावा)
2012- विराट कोहली (185 धावा)
2014- विराट कोहली (319 धावा)
2016- विराट कोहली (273 धावा)
2021- केएल राहुल (194 धावा)
2022- विराट कोहली (296 धावा)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाकडून 130 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा! उपांत्य सामन्यात हेल्स-बटलरने उडवला 10 गड्यांनी धुव्वा
T20WC: फिफ्टी करताच हार्दिकने लावला विक्रमांचा तडाखा, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय