भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील (india tour of south africa) कसोटी मालिकेत पराभव पत्करला. कसोटी मालिकेती तिसरा आणि शेवटचा सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू झाला होता. दक्षिण अफ्रिकेने या सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकाही नावावर केली. कर्णधार विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, असे होऊ शकले नाही. दरम्यान दक्षिण अफ्रिका तिसरा असा देश बनला आहे, ज्याठिकाणी विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सर्वाधिक कसोटी सामने गमावले आहेत.
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असल्याचे सांगितले जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने विदेशातील अनेक महत्वाच्या मालिका आणि सामने जिंकले आहे. परंतु, दक्षिण अफ्रिकेत मात्र त्याची कमाल चालली नाही. भारताने मालिकेतील सेंचुरियनमध्ये खेळलेला पहिला सामना ११३ धावांनी जिंकला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्स राखून सामने जिंकले. दरम्यान, विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ केपटाऊन कसोटीनंतर दक्षिण अफ्रिकेतील तिसरा कसोटी सामना पराभूत झाला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सर्वाधिक कसोटी सामने पराभूत झालेल्या देशांचा विचार केला तर, दक्षिण अफ्रिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने विराटच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सहामध्ये संघाला पराभव मिळाला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियात विराटच्या नेतृत्वातील भारताच्या कसोटी संघाने ७ सामने खेळले आणि त्यापैकी तीनमध्ये पराभव पत्करला. दक्षिण अफ्रिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अफ्रिकेत खेळलेल्या ५ कसोटी सामन्यात विराटने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यापैकी तीन सामन्यात पराभव पत्करला.
असे असले तरी, भारतात विराट कोहलीचे कसोटी कर्णधाराच्या रूपातील प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने मायदेशात खेळलेल्या ३१ कसोटी सामन्यांपैकी फक्त दोन सामने गमावले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
जयपूरचा पटनाला दणका! वेगवान सामन्यात बेंगलोरने गुजरातला रोखले
VIDEO: मालिका गमावल्यावर विराटकडून आली सर्व प्रश्नांची उत्तरे; पाहा काय म्हणाला कर्णधार
व्हिडिओ पाहा –