भारतात क्रिकेट हा सर्वात प्रिय खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये पैसाही खूप आहे. भारतातील अनेक क्रिकेटपटू हे कोट्याधीश आहेत. भारतीय क्रिकेटपटूंची लाईफस्टाईल बघण्यासाठी अनेक क्रिकेट चाहते उत्सुक असतात. क्रिकेटप्रेमी त्यांच्या गाड्या, त्यांचे घर अशा अनेक गोष्टी बघण्यास उत्सुक असतात. आज आम्ही भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या पिटाऱ्यातील काही अनमोल गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
भारतीय संघाचा कर्णधार विराट जगातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या सूचित आहे, जो लक्जरी लाईफ जगतो. विराट कोहली हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूपैकी एक आहे. फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या सूचित विराट कोहलीचे नाव आहे. तो १९६ कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पनासह जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीकडे अनेक अनमोल वस्तू आहेत. चला बघूया विराट कोहलीच्या ६ मौल्यवान वस्तू…
फ्लाइंग स्पर कारचा मालक आहे विराट
फाइनेंशियल एक्सप्रेसनुसार विराट कोहली हा बेंटले फ्लाइंग स्पर कारचा मालक आहे. या सेडान कारची किंमत तब्बल ३.९७ कोटी आहे.
मुंबईमध्ये ३४ कोटींचे घर आहे विराटाचे
विराट कोहलीचा मुंबईमधील वरळी येथे एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट विराट-अनुष्काने त्यांच्या लग्नाअगोदर २०१६ मध्ये घेतला होता. ‘ओमकार १९७३’ मध्ये ३५ व्या फ्लोअरवर हा फ्लॅट आहे. हा फ्लॅट ७,१७१ स्क्वेअर फूटचा आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल ३४ कोटी रुपये आहे.
विराटकडे आहे ८० कोटींचा बंगला
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा हरियाणा येथिल गुरुग्राममध्ये एक सुंदर बंगला आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, या बंगल्याची किंमत ८० कोटी रुपये आहे. या बंगल्यात एक स्विमींग पूल, जिम आणि सुंदर सजावटीचे सामान आहे.
द बेंटले कॉन्टिनेंटल
विराट कोहली हा कारप्रेमी आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्याच्याकडे अनेक सुंदर कारचे कलेक्शन आहे, ज्यातील द बेंटले कॉन्टिनेंटल त्याच्या आवडत्या कारमधून एक आहे. त्याने ही कार २०१८ मध्ये विकत घेतली होती. त्याच्या मुलीच्या जन्माआधी विराट आणि अनुष्काला याच कारमध्ये एकत्र बघितले गेले होते. या कारची किंमत जवळपास ४ ते ४.६ कोटी आहे.
विराटचे वॉलेट आहे ८५ हजारचे
विराट कोहलीकडील मौल्यवान वस्तूंमध्ये त्याचे वॉलेटसुद्धा आहे. त्याच्याकडे लोएस मोयितोंजीया ब्रँडचे वॉलेट आहे, ज्याची किंमत ८५ हजार रुपये आहे.
प्रायवेट जेट
विराट कोहलीकडे एक प्रायवेटसुद्धा आहे, ज्याची किंमत १२५ कोटी रुपये आहे. या जेटचा वापर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का फिरण्यासाठी करतात. विराट आणि अनुष्का हे खूप महागडे जीवन जगतात. त्यांची वार्षिक कमाई २६ मिलियन डॉलर (१९६ कोटी रुपये) आहे.
महत्वाच्या बातम्या
अंडी-ब्रेड, डिडिएलजे अन् बरंच काही! भारतीय खेळाडूंचा ‘रॅपीड फायर’ सेशन बनवेल तुमचाही दिवस
INDvNZ: टीम इंडिया, सिनेमातील पोलीसांप्रमाणे काम करा; दिग्गजाच्या छुप्या संदेशाचा अर्थ काय?
‘विराट’ फटका! गोलंदाजाच्या चेंडूवर कोहलीचा गगनचुंबी षटकार, सर्व खेळाडू पाहतचं राहिले