भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात धमाकेदार खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने हॅरिस रौफ याला 19व्या षटकात लागोपाट दोन षटकार मारले होते. या जबरदस्त प्रदर्शनामुळे भारताने हा सामना जिंकला आणि विराटचे ते षटकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. शनिवारी (2 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमने सामना आहेत. त्याआधी विराट कोहली आणि हॅरिस रौफ यांची मैदानात गळाभेट झाली.
आशिया चषक 2023 ची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी झाली. शनिवारी भारतीय संघ आशिया चषक अभियानाची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून करेल. उभय संघांतील हा सामना श्रीलंकेतील कँडी शहरात खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघ याच ठिकाणी सराव करताना दिसले. सामन्याच्या एक दिवस आधी हॅरिस रौफ (Haris Rauf) आणि विराट कोहली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामथ्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांची जवळपास वर्षानंतर भेट होत आहे. विराट कोहलीने माललेल्या दोन लागोपाठ षटकारांनंतर पहिल्यांदाच हॅरिस भारतीय दिग्गजाशी भेटत असल्याने चाहत्यांमध्येही याबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Virat Kohli meets Haris Rauf in Today's Practice session.pic.twitter.com/sHyeZsfihH
— CricketGully (@thecricketgully) September 1, 2023
दरम्यान, उभय संघांतील शनिवारचा सामना दुपारी 3.30 मिनिटांनी सुरू होणार आहेत. त्याआधी अर्धा तार सामन्याची नाणेफेक पार पडेल. भारतीय संघ मागच्या काही दिवसांपासून खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि संघनिवडीमुळे चर्चेत आहेत. अशात संघाचे आशिया चषकातील प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. (Virat Kohli meets Haris Rauf in Today’s Practice session.)
महत्वाच्या बातम्या –
‘हा’ भारतीय ठेचणार बाबरच्या नांग्या, IND vs PAK सामन्यापूर्वी दिग्गजाची भविष्यवाणी
सलामीवीर म्हणून कमी पडल्याचे रोहितने केले मान्य! आशिया चषकासाठी बदलणार खेळण्याची पद्धत