---Advertisement---

शून्यावर बाद होताच ‘किंग कोहली’च्या नावावर कर्णधार म्हणून बरेच लाजिरवाणे विक्रम जमा

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरू झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाला लागोपाठ तीन धक्के बसल्याने संघ काहीसा काहीसा पिछाडीवर पडला. या सामन्यातून टी२० विश्वचषकानंतर पुनरागमन करणारा भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली खातेही न खोलता माघारी परतला. याबरोबर त्याच्या नावे अनेक नकोसे विक्रम जमा झाले.

शून्यावर परतला विराट
टी२० विश्वचषकानंतर विराट कोहली याने काही काळ विश्रांतीची मागणी बीसीसीआयकडे केली होती. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेतून व कानपूर येथील पहिल्या कसोटीतून माघार घेतलेली. मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ उशीरा सुरू झाल्यानंतर मयंक अगरवाल व शुबमन गिल यांनी संघाला ८० धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर एजाज पटेलने गिलसह पुजारा व विराट यांना शून्यावर तंबूत धाडले. विराटला बाद देण्याचा निर्णय काहीसा विवादित राहील.

शून्यावर बाद होताच अनेक नकोसे विक्रम नावावर
एजाज पटेलच्या चेंडूवर बाद होताच विराट कर्णधार या नात्याने दहाव्यांदा शून्यावर तंबूत परतला. ही कोणत्याही भारतीय कर्णधाराची सर्वांत निराशाजनक कामगिरी ठरते. या यादीमध्ये मन्सूर अली खान पतौडी ५ व एमएस धोनी ४ वेळा शून्यावर बाद होताना दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत. विराट सहाव्यांदा मायदेशात शून्यावर बाद झाला आहे. यामध्ये पतौडी पाच वेळा तर धोनी व कपिल देव हे चार वेळा कर्णधार असताना मायदेशात खाते खोलू शकले नव्हते.

पहिल्या दिवशी भारतीय संघ दोनशे पलिकडे
पावसामुळे मुंबई कसोटीच्या पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मयंक अगरवाल व शुबमन गिल यांनी संघाला ८० धावांची सलामी दिली. शुबमन ४४ धावांवर बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली खाते न खोलता बाद झाले. मात्र, मयंक याने दिवसाअखेर नाबाद राहत १२० धावा केल्या. भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ बाद २२१ धावा केल्या. न्यूझीलंडसाठी सर्व ४ बळी एजाज पटेलने मिळवले.

महत्त्वाच्या बातम्या-

२०२१ मध्ये इंटरनेटवर ‘या’ खेळाडूंचे नाव राहिले चर्चेत; घटली सचिनची लोकप्रियता

सलग पाचव्यांदा नाणेफेक भारताच्या पारड्यात; न्यूझीलंडच्या खेळाडूने उपस्थित केली शंका

निरेतील खेळाडूंचे राज्यभर कौतुक; आंतरराष्ट्रीय तायक्वांडो कराटे स्पर्धेत पटकवले २ सुवर्ण, ४ रौप्य व ७ कांस्य पदक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---