इंडियन प्रीमियर लीग 2020 मधून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. 6 नोव्हेंबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या एलिमिनेटर सामन्यात पराभव झाल्यामुळे बेंगलोर संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने वास्तव्य बदललं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार मालिका
आयपीएलनंतर भारतीय संघ नोव्हेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारताला तीन वनडे सामने, तीन टी -20 सामने आणि चार कसोटी सामने खेळायचे आहेत. ही मालिका जैव सुरक्षित बबलमध्ये खेळली जाईल.
विराट कोहली दौऱ्याची तयारी करणार सुरु
या महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपली तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेले आणि आयपीएलचा भाग नसलेले खेळाडू भारतीय संघाच्या वेगळ्या बायो बबलमध्ये सराव करत आहेत. विराट बेंगलोरचे आव्हान संपल्यानंतर लगेचच शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री भारतीय संघाच्या बायो बबलमध्ये वास्तव्यास आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्णधार विराट कोहली एक किंवा दोन दिवसांनंतर या दौऱ्याची तयारी सुरू करेल.
पुजारा, विहारी, मयंक यांनी सुरु केला सराव
किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रमुख फलंदाज मयंक अगरवाल, कसोटी क्रिकेटचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा, नवोदित क्रिकेटपटू हनुमा विहारी हे कठोर परिश्रम करत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार दिवस-रात्र कसोटी सामना
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेडला खेळणार असून हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा भारताचा परदेशातील गुलाबी चेंडूने खेळला जाणारा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
बायो बबल म्हणजे मानसिक आरोग्यासाठी समस्या -विराट
दोन दिवसांपूर्वी कोहलीने बायो बबलमध्ये राहणे मानसिक आरोग्यासाठी समस्या असल्याचे सांगितले होते.
सन 2018 मध्ये भारतीय संघाने मिळवला विजय
भारतीय संघाने 2018 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरील कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. परंतु स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर त्या मालिकेत खेळत नव्हते. बॉल टेम्परिंग या प्रकरणासाठी दोन्ही दिग्गजांना निलंबित करण्यात आले होते. पण यावेळी मात्र ते दोघेही भारतीय संघात असणार आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे सामन्याचे वेळापत्रक :
पहिला वनडे – 27 नोव्हेंबर, सिडनी
दुसरा वनडे – 29 नोव्हेंबर, सिडनी
तिसरा वनडे – 2 डिसेंबर, कॅनबेरा
टी20 सामन्यांचे वेळापत्रक :
पहिला टी20 – 4 डिसेंबर, कॅनबेरा
दुसरा टी20- 6 डिसेंबर, सिडनी
तिसरा टी20- 8 डिसेंबर, सिडनी
कसोटी सामन्यांचे वेळापत्रक :
पहिला कसोटी – 17 डिसेंबर, ऍडिलेड
दुसरा कसोटी – 26 डिसेंबर, मेलबर्न
तिसरा कसोटी – 7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या –
खराब प्रदर्शनानंतरही ‘या’ गोलंदाजाला मिळाली भारतीय वनडे संघात संधी, काय आहे कारण?
चेन्नईकडून आयपीएल गाजवलेल्या ऋतुराज गायकवाडचा पुण्यात येताच झाला मोठा सन्मान
ट्रेंडिंग लेख –
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?