नेपीयर। भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघात आज पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
हा सामना संपल्यानंतर भारतीय संघातील एमएस धोनी, कर्णधार विराट कोहली, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू मॅकलीन पार्क मैदानावर थोडी मजा-मस्ती करताना दिसून आले आहेत. यावेळी विराट आणि धोनीने मैदानावर सेगवेची सवारी केली आहे.
याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओला ट्विटमध्ये कॅप्शन देताना म्हटले आहे की ‘धोनी आणि विराटची सामन्यानंतरची मस्ती.’
Post-game shenanigans courtesy @msdhoni & @imVkohli
This looks fun ????????????#TeamIndia #NZvIND pic.twitter.com/0EXXHYh2v7— BCCI (@BCCI) January 23, 2019
या सामन्यात भारतासमोर प्रखर सुर्यप्रकाशामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार 49 षटकात 156 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवनने नाबाद 75 धावांची खेळी केली तर विराटने 45, रोहित शर्माने 11 आणि अंबाती रायडूने नाबाद 13 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना 38 षटकात सर्वबाद 157 धावा करता आल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार केन विलियमसनने 64 धावांची अर्धशतकी खेळी केली.
या सामन्यात भारताकडून कुलदीप यादवने 39 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 19 धावांत 3, युजवेंद्र चहलने 43 धावांत 2 आणि केदार जाधवने 17 धावांत 1 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–केवळ ३६ वनडे खेळलेल्या कुलदीप यादवने जगाला या गोष्टीमुळे दखल घ्यायला लावली
–न्यूझीलंडमध्ये क्रिकेट सामन्यात लख्ख सुर्यप्रकाशामुळे कर्णधाराने खेळाडूला दिला गाॅगल






