डब्लिन । बुधवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २००० धावा करणारा तिसरा फलंदाज होऊ शकतो. यासाठी त्याला केवळ १७ धावांची गरज आहे.
सध्या विराटच्या नावावर ५७ टी२० डावात १९८३ धावा आहेत तर या प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या दोन स्थानावार न्यूझीलंडचे खेळाडू आहेत.
मार्टिन गप्टीलने ७५ सामन्यात २२७१ धावा केल्या आहेत तर ब्रेंडन मॅककुलूमच्या नावावर ७० डावात २१४० धावा आहेत.
जर विराट आयर्लंड किंवा इंग्लंड मालिकेमध्ये ५ सामन्यात मिळून २९० धावा करु शकला तर तो सचिनएवढाच मोठा एक विक्रम करणार आहे.
सचिन वनडेत आणि कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. विराट २९० धावा करु शकला तर तो टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.
असं झालं तर तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू भारतीय होतील आणि इतिहासात पहिल्यांदाच असे होईल.
कारण जेव्हा टी२० क्रिकेट सुरु झाले तेव्हा कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अॅलन बॉर्डर यांच्या नावावर होता. त्यामुळे एकाच वेळी सर्व विक्रम भारताकडे असण्याची ही पहिलीच वेळ असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–अजिंक्य रहाणेने मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची शाब्बासकी
–अर्जून तेंडूलकरमुळे भारतीय संघात घराणेशाहीचे दर्शन! चाहत्यांचा हल्लाबोल
–या खास कारणामुळे केदार जाधवने मानले पत्नीचे आभार