टी२० विश्वचषक २०२१ मधील सराव सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले होते, पण सुपर १२ मध्ये ज्याप्रकारे भारतीय संघाने आपला पहिला सामना खेळला ते अनपेक्षित होते. भारतीय संघाला आपला पारंपारिक प्रतिद्वंधी पाकिस्तान संघाकडून पराभूत व्हावे लागले. आता रविवारी (३१ ऑक्टोबर) भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. ज्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू जोरदार तयारी करत आहेत.
विराट कोहलीही नेटमध्ये चांगलाच घाम गाळत आहे. तो विविध फटक्यांचा सराव करत आहे. ज्यामुळे संघातील खेळाडूसुद्धा खूप प्रेरित होत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.
आयसीसीने गुरुवारी (२८ ऑक्टोबर) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये विराट नेट प्रॅक्टिस दरम्यान जोरदार शॉट्स खेळताना दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा तरुण खेळाडू इशान किशन आणि श्रेयस अय्यर त्याच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. याच दरम्यान, विराट काही अद्भुत फटके मारतो, तेव्हा इशान खूप अचंबित होतो, विराटला प्रोत्साहन देत, मोठ्याने म्हणतो, विराटभाई शॉट.
विराटच्या नेट प्रॅक्टिसचा हा व्हिडिओ एका तासात साडेचार लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर ११०० हून अधिक युजर्सनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.
https://www.instagram.com/tv/CVkXQo6lrwY
दुबईत खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकाच्या सामन्यात विराटने पाकिस्तानविरुद्ध ५७ धावांची दमदार खेळी खेळली होती. रिषभ पंत व्यतिरिक्त त्याला इतर फलंदाजांनी त्यास योग्य ती साथ दिली नाही. याशिवाय भारतीय गोलंदाजांनी सुमार प्रदर्शन केले. भारतीय गोलंदाज पाकिस्तानविरुद्ध एकही विकेट घेऊ शकले नाही. ज्यामुळे पाकिस्तानने १० दहा गडी राखून विजय मिळवला होता.
त्यापूर्वी विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यात भारतीय संघाने आपले दोन्ही सामने जिंकले होते, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. विराट कोहलीच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठता आला. विराटने एक टोक लावून धरले. त्याने ४९ चेंडूंचा सामना करत ५७ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. या सामन्यात ऋषभ पंतने ३९ धावांचे योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे भारीच! जेसन रॉयने ठोकला ‘ज्युरासिक सिक्स’, आयसीसीने शेअर केला खास व्हिडीओ
आयपीएलदरम्यान धोनीने कोणता सल्ला दिला होता? मार्कस स्टॉयनिसने केला खुलासा
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला टेंशन, ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी






