वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 पूर्वी भारतीय संघाची स्थिती कमकुवत दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंजत आहेत. त्याची प्रचिती सध्याच्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेतील शेवटची कसोटी मुंबईत खेळली जातेय. विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्या डावात अपयशी ठरले. रोहितने 18 धावा केल्या तर विराट 4 धावांवर धावबाद झाला.
केवळ मुंबई कसोटीतच नाही तर या मालिकेतही भारताच्या या दोन्ही दिग्गजांनी फलंदाजीत निराशा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील 5 डावात विराट कोहलीने 92 आणि रोहित शर्माने 80 धावा केल्या आहेत. रोहित-विराट कसोटीत सतत अपयशी ठरत आहेत. केवळ रणजी ट्रॉफी न खेळणे हे देखील त्याच्या अपयशाचे कारण असल्याचे मानले जाते. विराट कोहली 2012 पासून तर रोहित शर्मा 2015 पासून रणजी ट्रॉफी खेळलेला नाही.
रणजीमधील विराट कोहलीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने 23 सामन्यात 50.77 च्या सरासरीने 1574 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 5 शतकेही झळकावली आहेत. तर रोहित शर्माने 42 सामन्यात 72 च्या सरासरीने 3892 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने 14 शतके झळकावली. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्याच वर्षी तो रणजीही खेळला होता.
भारतीय संघातील इतर फलंदाजांचा फॉर्म देखील तितकाचा चांगला दिसून आला नाही. यशस्वी जयस्वाल सातत्य दाखवण्यात अपयशी ठरला. तर, अगदी तशीच कामगिरी युवा सर्फराज खान याची देखील राहिली. शुबमन गिल याची कामगिरी देखील भारतीय संघासाठी तितकी लाभदायी ठरली नाही. यष्टीरक्षक रिषभ पंत तसेच रविंद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन हे अष्टपैलू देखील भारतीय संघाच्या फलंदाजीत योगदान देऊ शकले नाहीत.
हेही वाचा –
रिटेंशनमध्ये कोहलीच्या आवडत्या सिराजवर का भारी पडला यश दयाल? जाणून घ्या आतली कहाणी
“कोणीतरी लवकरच पिवळी जर्सी घालेल”, सीएसकेच्या माजी खेळाडूने पंतबाबत दिले मोठे संकेत
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!