भारताने काल(28 जानेवारी) झालेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेट्सने विजय मिळवला. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने 60 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका पार पाडली. मात्र यावेळी त्याने नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.
तो म्हणजे 2017नंतर प्रथमच त्याला लागोपाठ 4 वन-डे सामन्यांपैकी एकाही सामन्यात शतक करता आलेले नाही. 3 सप्टेंबर, 2017नंतर विराटने 29 वन-डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 10 शतके केली आहे. पण मागील चार सामन्यांत त्याला एकही शतक करता आले नाही.
विराटने जर न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात शतक केले असते तर ऑक्टोबर 2017पासून कमीत कमी 3 सामन्यातील एका तरी सामन्यात शतक करण्याचा त्याचा क्रम सुरू राहिला असता.
भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध 23 जानेवारीपासून तीन वन-डे सामने खेळला आहे. यामध्ये विराटने 45, 43 आणि 60 अशा धावा केल्या आहेत.
विराटने 3 सप्टेंबर,2017ला श्रीलंके विरुद्धच्या वन-डे सामन्यात नाबाद 110 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 5 वन-डे सामन्यात 180 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याला शतक करण्यात अपयश आले होते. तर 2017ला भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड विरुद्ध त्याने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली होती.
मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातही विराटने डरबन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते. तर तिसऱ्या सामन्यातही शतक ठोकले होते. मात्र त्याला इंग्लंड दौऱ्यात एकही शतक करता आले नाही.
त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये दौऱ्यावर आलेल्या विडींज संघाविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यात विराटने 140, नाबाद 157 आणि 107 धावा अशा तीन शतकी खेळी केल्या होत्या.
यावर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटने एडलेड येथे झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात 104 धावा केल्या होत्या. त्याने मागील 10 डावांमध्ये 3 शतके केली असून 27 डावांमध्ये तो शून्यावरही बाद झालेला नाही.
विराटने आतापर्यंत 222 वन-डे सामन्यात 59.51च्या सरासरीने 10533 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 39 शतके आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हिटमॅन रोहित शर्मासाठी ३१ जानेवारी ठरणार कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण
–सांगली एक्सप्रेस काही थांबेना! स्मृती मंधानाची तुफानी फटकेबाजी
–आयसीसी महिला टी२० विश्वचषक२०२० च्या वेळापत्रकाची घोषणा