काल दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाने विराट कोहलीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान ७००० धावा विक्रम मोडला. परंतु भारताच्या कर्णधाराला दक्षिण अफ़्रिकेच्याच एबी डिव्हिलिअर्सने केलेला वेगवान ८००० धावांचा विक्रम मोडण्याची मोठी संधी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आहे.
एबी डिव्हिलिअर्स २६ ऑगस्ट २०१५ रोजी न्यूजीलँड विरुद्ध खेळताना हा विक्रम केला होता. वेगवान ८००० धावा करण्यासाठी डिव्हिलिअर्सने घेतले होते फक्त १८२ डाव. सध्या विराट कोहलीच्या नावावर १७१ डावात ७७५५ धावा आहेत. म्हणजे हा विक्रम मोडण्यासाठी विराटला पुढील १० डावात करायच्या आहेत २४५ धावा.
भारत चॅम्पियन्स ट्रॉफटीमध्ये साखळीचे ३ सामने खेळणार आहे. जर भारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला तर भारताला स्पर्धेत एकूण ५ सामने खेळायला मिळतील. सराव सामन्यातील विराटचा एकूणच फॉर्म पाहून हा विक्रम त्याला करणे नक्कीच अशक्य नाही असे वाटते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमी डावात ८००० धावा करणारे खेळाडू
१८२ एबी डिव्हिलिअर्स
२०० सौरव गांगुली
२१० सचिन तेंडुलकर
२११ ब्रायन लारा
२१४ एमएस धोनी