---Advertisement---

विराटने सांगितले आपल्या आजवरच्या यशाचे गमक! म्हणाला, “मी दररोज स्वतःमध्ये…”

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हा सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर सर्वांची नजर असेल. आशिया चषकात सहभागी होण्यापूर्वी त्याने नुकतीच प्रसारण वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्याने अनेक खुलासे केले. आपण इतके यशस्वी कसे झालो याबाबत देखील त्याने प्रतिक्रिया दिली.

आशिया चषकासाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी त्याने मुलाखत दिली. यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. आतापर्यंत आपण असे यशस्वी का झालो याबाबत बोलताना तो म्हणाला,

“मी दरवेळी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक सामना, प्रत्येक सराव सत्रांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा माझा मानस आहे. याच गोष्टी मला दीर्घकाळासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देतात.”

विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानले जाते. पंधरा वर्षाच्या मोठ्या कारकीर्दीतही तो सातत्याने आपल्या तंदुरुस्तीवर भर देताना दिसला आहे. पुढील दोन महिने त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या काळात भारतीय संघ आशिया चषक व वनडे विश्वचषक खेळेल. या दोन्ही स्पर्धा भारतीय संघाला जिंकण्यासाठी विराटने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणे आवश्यक असेल.

विराट याने नुकतीच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पंधरा वर्षे पूर्ण केले आहेत. त्याने या दरम्यान आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 111 सामन्यात 8676, 275 वनडेत 12898 व 115 टी20 सामन्यात 4008 धावा जमा असून, या तब्बल 76 शतके समाविष्ट आहेत. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा व सर्वाधिक शतके याबाबतीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो.

(Virat Kohli Open Up On His Consistent Succesful Career)

हेही वाचाच-
‘हे थोडे कठीण…’, रक्षाबंधनच्या खास क्षणी हळहळली शुबमनची बहीण; तुम्हीही व्हाल भावूक
भारताचा माजी खेळाडू बाबरच्या शतकावर फिदा; म्हणाला, ‘त्याची फलंदाजी डोळ्यांना सुखावणारी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---