---Advertisement---

जसप्रीत बुमराहमुळे विराटला सुर गवसला?, पाहा काय आहे कारण

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सुरुवातीच्या तीन सामन्यात अतिशय खराब कामगिरी केली होती. या तीनही सामन्यात त्याने एकूण 18 धावा केल्या होत्या. खराब फलंदाजीमुळे त्याच्यावर टीकाही झाल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली आणि 53 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर चेन्नईविरुद्ध विराटने 43 आणि 90 धावांचा शानदार डाव खेळला. विराटने फॉर्ममध्ये येण्याचे कारण सांगितले आहे.

सुपर ओव्हरच्या सामन्यामुळे बदलली मानसिकता 

विराटने आपल्या खराब फॉर्मबद्दल कबुली दिली आहे. त्याने सांगितले की सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याने स्वत: वर खूप दबाव आणला होता. परंतु मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सुपर ओव्हर सामन्यामुळे त्याची मानसिकता बदलली आणि तो फॉर्ममध्ये परत आला.

मुक्तपणे खेळण्याची मिळाली प्रेरणा 

सुपर ओव्हरमध्ये केलेल्या फलंदाजीबद्दल बोलताना विराट म्हणाला, “मुंबई इंडियन्सविरूद्ध सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर पुल शॉट मारून मला मुक्तपणे खेळण्याची प्रेरणा मिळाली.”

फलंदाजीचा लुटला आनंद 

चेन्नई विरुद्ध 90 धावांच्या केलेल्या खेळीबद्दल तो म्हणाला, “सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मी स्वत: वर खूप दबाव आणत होतो. जेव्हा आपण स्वत: वर जास्त ओझे टाकू लागता, तेव्हा आपण खेळाडू म्हणून चांगले योगदान देऊ शकत नाही. आपल्या संघाला देखील आपल्या योगदानाची आवश्यकता असते. सुपर ओव्हर सामन्यामुळे माझे विचार खरोखरच बदलले, त्यानंतर मी सराव करण्यास सुरुवात केली आणि माझ्या फलंदाजीचा आनंद लुटला.”

सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सहावा

आयपीएलमध्ये या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट सहाव्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 256 धावा केल्या आहेत. पंजाबचा कर्णधार केएल राहुल 387 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ‘हे’ ३ मोठे विक्रम असतील विराट कोहलीच्या निशाण्यावर

-‘त्या’ खेळाडूला दिलेल्या जीवदानामुळेच आम्ही सामना गमावला – विराट कोहली

-एकच नंबर! पृथ्वी शाॅने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराट कोहली अचंबित, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख-

-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?

-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---