IND VS AFG T20I : तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू डावाची सुरूवात मात्र अत्यंत खराब झालेली आहे. त्यात विराट कोहलीला पहिल्यांदाच नको असलेल्या गोष्टीचा सामना करावा लागला आहे.
कारकिर्दीतील पहिलेच गोल्डन डक
आयपीएलच्या आपल्या होम ग्राउंड वरच विराटवर एक नामुष्की ओढवलेली. अफगाणिस्तान विरूद्ध चालू असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. याबरोबरच हे त्याच्या टी20 कारकिर्दीतील मधील पहिले गोल्डन डक ठरले. ज्यावेळी फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद होतो, त्याला गोल्डन डक मानले जाते. तसेच विराटने खेळलेल्या 117 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत झीरो वर बाद होण्याची ही 5वी वेळ ठरली. (Stunned Bengaluru Crowd Goes Completely Silent As Virat Kohli Registers 1st Golden Duck In T20Is)
भारताकडून सर्वाधिक झीरोंच्या यादीत पाचवा
कोणत्याही फलंदाजाला नको वाटणाऱ्या या यादीत आता विराटचे नाव सामील झालेले आहे. त्याने आजपर्यंत खेळलेल्या 580 डावांत 35 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तो आता त्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. याआधी सचिन तेंदूलकर आणि विराट, दोघांच्या नावे प्रत्येकी 34 डक होते.
भारताकडून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज –
1) झहीर खान – 44 वेळा
2) इशांत शर्मा – 40 वेळा
3) हरभजन सिंग – 37 वेळा
4) अनिल कुंबळे – 35 वेळा
5) विराट कोहली – 35 वेळा
यादीत पहिले चारही जण गोलंदाज असल्याचे आपणास दिसून येईल. फक्त टॉप 7 मधील फलंदाजाचा जर विचार केला तर मात्र तो सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. त्यामुळे एक नकोसा वाटणारा रेकॉर्ड विराटच्या नावावर झालेला आहे.
वाचा आणखी बातम्या –
IND vs AFG । रोहितने मजेत घेतलेला निर्णय संघाला पडला महागात! अवघ्या 22 धावांवर चार फलंदाज तंबूत
थोडा चेंज! INDvsAFG तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहितने मजेमजेत घेतली फलंदाजी, संघात तीन महत्वाचे बदल