Virat Kohli Out Or Not Out :- भारत विरुद्ध श्रीलंका संघात रविवारी (04 ऑगस्ट) आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या विकेटवरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. विराटच्या विकेटवरुन श्रीलंकेच्या संपूर्ण संघाने दिलेली प्रतिक्रियाही लक्षवेधी ठरत आहे. सामन्यादरम्यान असे नेमके काय घडले?, जाणून घेऊया…
त्याचे झाले असे की, विराट कोहली सहसा विक्रम मोडणे किंवा नवा विक्रम रचल्यामुळे चर्चेत येतो. मात्र यावेळी विराट बाद न दिल्याने आणि डीआरएसच्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट 11 धावांनंतर खेळत असताना ही घटना घडली. पंचांनी विराटला पायचीत दिले. पण विराटने डीआरएस घेतला, तेव्हा चेंडू बॅटला लागल्याचे दिसून आले. दुसरीकडे, विराटची प्रतिक्रिया सांगत होती की त्याला स्वतःला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्याचे जाणवले नव्हते.
भारतीय संघाच्या डावाच्या 15व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली. अकिला धनंजय गोलंदाजी करत होता, त्याच्याविरुद्ध कोहलीने लेग साइडने बॅकफूटवर जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू चुकला. कोहली स्टंपच्या अगदी समोर उभा असल्याने पंचांनी त्याला पायचीत दिले. पण कोहलीने नॉन-स्ट्राइकिंग एंडला उभ्या असलेल्या शुभमन गिलचा सल्ला घेऊन डीआरएस घेतला. कोहलीच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाल्याची कल्पना मैदानावर उपस्थित असलेल्या कुणालाही नव्हती. खुद्द विराटलाही याची कल्पना नव्हती, पण डीआरएस अल्ट्रा एजमध्ये चेंडू बॅटला स्पर्श झाल्याचे दाखवले. याच कारणामुळे त्याला नाबाद घोषित करण्यात आले.
डीआरएसमधील हा निर्णय पाहून श्रीलंकेचे खेळाडूही अवाक् झाले. अगदी पव्हेलियनमधून श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यही हा निर्णय पाहून चकित झाले होते.
The reaction from Sri Lankan team after the DRS. pic.twitter.com/pA6TVIcQH1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 4, 2024
दरम्यान, जीवदान मिळाल्यानंतरही विराट त्याचा फायदा उचलू शकला नाही. विराट 19 चेंडूत केवळ 14 धावा करून बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
Video : रोहितचा थ्रो हुकला, पण विराटने चित्त्याप्रमाणे चपळता दाखवत श्रीलंकेच्या फलंदाजाला केले रनआऊट
कॅच घेतल्यानंतर केला बिहू डान्स, विराट कोहलीचं अनोखं सेलिब्रेशन तुफान व्हायरल
IND vs SL पहिल्या चेंडूवर विकेट घेवून मोहम्मह सिराजनं रचला इतिहास..!