---Advertisement---

आशिया चषकात विराटला पाकिस्तानमधून बोलावणे, स्टेडियममधील खास फोटो व्हायरल

On: शुक्रवार, सप्टेंबर 1, 2023 3:18 PM
virat kohli
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान संघाचा क्रिकेट सामना म्हणलं की, क्रिकेट विश्वातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीचे लक्ष या सामन्यावर असते. अशातच भारतीय संघाच्या खेळाडूंचे चाहते जगभरात पसरले आहेत. भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहली हा या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे. विराटचे चाहते भारतात तर आहेतच पण त्यासोबत त्याचे चाहते जगभरात आहेत. अशात पाकिस्तान संघ जरी भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी असला तरी देखिल विरटला पाकिस्तानात देखिल खूप मानले जाते. सध्या त्याच्या पाकिस्तानच्या चाहत्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. यात पाकिस्तानविरुद्ध नेपाळ या संघातील सामना पाकिस्तान संघाने 238 धावांनी विजय मिळवला. दरम्यान या स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) चा फोटो घेऊन एक पाकिस्तानी चाहता स्टेडियममध्ये मिरवत होता. विराटच्या या चाहत्याने सामन्यादरम्यान सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा हा फोटो भारतासोबत पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत विराटच्या पाकिस्तानी चाहत्याने विराटला पाकिस्तानात खेळताना पाहायची इच्छा व्यक्त केली आहे.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1697265134119604707?s=20

पाकिस्तानविरुद्ध नेपाळ सामन्यत पाकिस्तान संघाचा कर्णधार फलंदाज बाबर आझम याने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. बाबरने या सामन्यात फलंदाजी करताना 131 चेंडूत 151 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 106 च्या जवळपास होता. सोबतच सातव्या क्रमांकावर फलंदाजी क्रमांकावर फलंदाजी करताना इफ्तिखार अहमद याने 71 चेंडूड 109 धावा ठोकत तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 153 होता.

भारत आणि पाकिस्तान भिडणार या दिवशी
भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ 2 सप्टेंबरला आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघानी या सामन्यासाठी चांगलीच तयारी केली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराटवर सर्वांच्या नजरा राहणार आहेत. सोबतच संघात अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. आता भारतीय संघ कशाप्रकारे आशिया चशकात खेळतो हे पाहणे मनोरंजनाचे ठरणार आहे. (virat kohli pakistani fan in asia cup 2023 pakistan vs nepal match)

महत्वाच्या बातम्या-  
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास बदलणार! पहिल्यांदाच तृतीयपंथी खेळाडूचे होणार पदार्पण, लगेच घ्या जाणून
‘मला भारतात कसोटी मलिका खेळूण जिंकायची आहे’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---