---Advertisement---

विराट कोहली ‘या’ दिग्गजाच्या नेतृत्वात खेळला होता शेवटचा रणजी सामना, यंदा हा खेळाडू कर्णधार

Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्ध दिल्ली संघाकडून खेळण्यास सज्ज आहे. त्याला दिल्लीच्या संघात स्थान मिळाले आहे. आता रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीची कमान युवा आयुष बदोनीकडे सोपवण्यात आली आहे. कोहलीने शेवटचा रणजी ट्रॉफी 2012 मध्ये खेळला होता. तो त्या सामन्यात वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली खेळला. आता तो रेल्वेविरुद्धच्या सामन्यात आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली खेळेल.

जेव्हा विराट कोहली शेवटचा रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. तेव्हा तो भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार होता पण आता तो खेळातील सर्वात मोठ्या दिग्गजांपैकी एक आहे. या माजी भारतीय कर्णधाराच्या नावावर आता 81 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन या सुपरस्टारच्या घरी परतण्यासाठी सर्व व्यवस्था करण्याची तयारी करत आहे.

सामन्याच्या व्यवस्थेबद्दल बोलायचे झाले तर, डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा म्हणाले की, आम्हाला माहित आहे की विराटच्या उपस्थितीमुळे सामन्याचे महत्त्व खूप वाढेल. आमच्याकडे नियमित रणजी सामन्यासाठी 10 ते 12 वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी असतात पण विराटच्या सरावात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून आम्ही निश्चितच सुरक्षा वाढवू. आम्ही दिल्ली पोलिसांनाही सामन्याबद्दल माहिती दिली आहे.

चाहत्यांना रणजी सामने मोफत पाहण्याची व्यवस्था आहे. सहसा चाहत्यांसाठी एक स्टँड उघडला जातो परंतु या सामन्यासाठी, डीडीसीए आंबेडकर स्टेडियमच्या शेवटी तीन स्टँड उघडेल. तथापि, हा सामना थेट प्रक्षेपित केला जाणार नाही. ज्यामुळे कोहलीच्या चाहत्यांना नक्कीच निराशा होईल.

रेल्वेविरुद्ध दिल्ली संघ- 

आयुष बदोनी (कर्णधार), विराट कोहली, प्रणव राजवंशी (यष्टीरक्षक), सनत सांगवान, अर्पित राणा, मयंक गुसाई, शिवम शर्मा, सुमित माथूर, वंश बेदी (यष्टीरक्षक), मणी ग्रेवाल, हर्ष त्यागी, सिद्धांत शर्मा, नवदीप सैनी, यश धुल्ल , गगन वत्स, जॉन्टी सिद्धू, हिम्मत सिंग, वैभव कांडपाल, राहुल गेहलोत, जितेश सिंग

हेही वाचा-

13 वर्षांनंतर रणजीमध्ये विराट कोहलीचे कमबॅक, या संघाविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार
रणजी ट्राॅफीच्या शेवटच्या लीग सामन्यात नाही खेळणार रोहित, जयस्वालसह ‘हे’ स्टार खेळाडू
IND vs ENG; तिसऱ्या सामन्यातही भारताचा विजय पक्का? दिग्गज गोलंदाजाचे होणार पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---