जोहान्सबर्गच्या (Johannesburg) द वांडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना (South Africa vs India 2nd test) सुरू आहे. या सामन्यात सध्या दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले होते. त्याच्याऐवजी कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलला सोपवण्यात आली आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय चाहत्यांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे.
विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर असला तरीदेखील तो मैदानावर सराव करण्यात कुठेच कमी पडताना दिसून येत नाहीये. तो सामन्यात नसताना देखील अनेकदा मैदानावर दिसून आला आहे. दरम्यान दुसऱ्याच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (५ जानेवारी) त्याचा सराव करत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो मैदानावर घाम गाळताना दिसून येत आहे. तो दुसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह (Rahul Dravid) थ्रो डाऊनचा सराव करताना दिसून आला आहे. यावरून असा अंदाज बांधला जात आहे की, विराट कोहली केपटाऊन येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळताना दिसून येऊ शकतो.(Virat Kohli throw down practice with Rahul Dravid)
https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1478634672909275137?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478634672909275137%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fvirat-kohli-seen-doing-batting-practice-in-johhanesburg-with-head-coach-rahul-dravid-2690880
विराट कोहलीला पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. त्याने दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेतला होता. असे क्वचितच झाले आहे की, विराट कोहलीला दुखापतीमुळे संघातून माघार घ्यावी लागली आहे. आता मैदानावर सराव करताना पाहून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो.
मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना ११ ते १५ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. विशेष म्हणजे ११ जानेवारीला विराटची मुलगी वामिका हिचा पहिला वाढदिवस आहे.
महत्वाच्या बातम्या :
जोहान्सबर्गवर अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी! कुंबळेनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा दुसराच भारतीय
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
हे नक्की पाहा :