भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना नांगी टाकण्यास भाग पाडले. या डावात भारतीय कर्णधार विराट कोहलीने एक भविष्यवाणी केली होती. जी पुढच्याच चेंडूवर खरी ठरली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला.इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट व्यतिरिक्त इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर खातेही न खोलता माघारी परतला होता. तो बाद होण्यापूर्वी विराट कोहलीने भविष्यवाणी केल्याचे पाहायला मिळाले होते.
तर झाले असे की, पाहिल्या डावातील ५४ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथा चेंडू बुमराहने बाहेर टाकला होता. त्यामुळे तो चेंडू बटलरने सोडून दिला होता. त्यावेळी कॅमेरा कर्णधार विराट कोहलीकडे वळवण्यात आला होता. त्यावेळी कर्णधार विराट कोहली रिषभ पंतला म्हणत होता की,”बघ आता हा बाद होईल..” आणि पुढच्याच चेंडू जोस बटलरच्या बॅटची कडा घेत रिषभ पंतच्या हातात गेला.(Virat Kohli predicts jos Buttler dismissal watch video)
Captain or fortune-teller? 😅
Kohli's 🔮 skills on show on Day 1 😎
Tune into #SonyLIV now 👉 https://t.co/E4Ntw2hJX5 📺📲#ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #ViratKohli #Prediction #JosButtler pic.twitter.com/kQCIFwmsrc
— Sony LIV (@SonyLIV) August 4, 2021
भारतीय गोलंदाजांची अप्रतिम गोलंदाजी
या डावात भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली.गेल्या काही महिन्यांपासून फ्लॉप ठरलेल्या जसप्रीत बुमराहने या सामन्यात जोरदार पुनरागमन करत, इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी धाडले. तर मोहम्मद शमीला ३ ,शार्दुल ठाकूरला २ आणि मोहम्मद सिराजला एक गडी बाद करण्यात यश आले.
भारतीय फलंदाजांची संयमी सुरुवात
भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत,भारतीय संघाचा डाव अवघ्या १८३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर आता भारतीय संघातील फलंदाजांवर,संघाला चांगल्या स्थितीत पोहचवण्याची जबाबदारी असणार आहे. या सामन्यात मयंक अगरवालच्या अनुपस्थित केएल राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली होती. दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारतीय संघाने ४ फलंदाज गमावत १२५ धावा केल्या होत्या. केएल राहुल ५७ धावांवर खेळत होता तर ७ धावांवर पंत त्याला साथ देत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–‘मुंबईकर खेळाडूच्या जागी कसोटी संघात हवा होता अश्विन,’ माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली नाराजी
–रोहित शर्मा-केएल राहुलची विक्रमी भागीदारी, तब्बल १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये घडला झाला ‘तो’ पराक्रम
–‘या’ मुंबईकरामुळे पांड्याची टीम इंडियातील जागा आहे धोक्यात, कमबॅकही झालंय अवघड