आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. कारण चाहत्यांचा आवडता विराट कोहली हा या फ्रँचायझीचा एक भाग आहे. विराट कोहली 2008 पासून आरसीबीसोबत असून, आयपीएल 2025 साठी नुकत्याच जाहीर झालेल्या रिटेन्शन लिस्टमध्ये कोहलीला आरसीबीने 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
कोहलीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे चाहत्यांचे अपार प्रेम मिळते. कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाकडे जाताना दिसतोय. मात्र, तो कधी निवृत्त होईल हे कोणालाच माहीत नाही. 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
सध्या विराटचा फॉर्म घसरला आहे. तो लवकरच फॉर्ममध्ये परतला नाही, तर त्याच्या कारकिर्दीबाबत निर्णय घेण्याचा निवड समितीवर दबाव वाढू शकतो. दरम्यान, कोहलीने निवृत्तीबाबतच्या अफवांचे खंडन केले आहे.
कोहलीने नुकतेच एक मोठे संकेत दिले आहेत की, तो 2027 पर्यंत क्रिकेट खेळत राहू शकतो. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या योजनांचा थेट उल्लेख केला नाही. मात्र, जर तो खेळत राहिला आणि तंदुरुस्त राहिला तर तो भारतासाठी 2027 चा वनडे विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
कोहलीने ‘आरसीबी बोल्ड डायरीज’मध्ये सांगितले की, “या आयपीएल सायकलच्या अखेरीस मी आरसीबीसाठी 20 वर्षे खेळेल आणि ते माझ्यासाठी खूप खास आहे. मला किमान 2027 पर्यंत खेळायचे आहे. मला आधी वाटले नव्हते की, मी या संघासाठी सलग इतका खेळेल. अवघ्या काही वर्षातच माझे त्या संघाशी एक भावनिक नाते तयार झाले. त्यांच्यासाठी मला एक ट्रॉफी जिंकायला नक्की आवडेल.”
कोहलीने आतापर्यंत 131 च्या स्ट्राइक रेटने आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना 8000 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 8 शतके आणि 55 अर्धशतकांचा समावेश आहे. आगामी हंगामात तो पुन्हा संघाचा कर्णधारही होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; पंजाब किंग्ज बनणार सर्वात मजबूत संघ, नवीन प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य!
रिषभ पंतवर भडकला रोहित शर्मा, VIDEO होतोय जोरदार व्हायरल
IND vs NZ; मुंबई कसोटीत भारताचे वर्चस्व! दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचे 9 गडी तंबूत