बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीने(सीओए) काही दिवसांपूर्वी भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. पण बीसीसीआयच्या एका अधिऱ्यांकारीचे मत आहे की रवी शास्त्रींनी मुख्य प्रशिक्षकपदी आणि विराट कोहलीने कर्णधारपदी कायम रहायला हवे, ज्यामुळे संघाला पुढे जाण्यात मदत होईल.
याबद्दल आएएनएसशी बोलताना बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘संघात होणाऱ्या बदलांच्या या दिर्घकालिन कालावधीत कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी नसते. शास्त्री आणि कोहली एकमेकांना पूरक आहेत आणि यशस्वी झालेल्या संघाचा अर्धा भाग बदलणे योग्य नाही.’
‘आत्ता प्रशिक्षकामध्ये बदल केल्याने सध्या खेळाडूंच्या असणाऱ्या मानसिकनेच्या समीकरणांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. जर यावेळी बदल केला तर पुढील 5 वर्षांसाठी रणनीती आणि योजनाही बदलतील. यावेळी हा निर्णय घेणे योग्य नाही.’
सध्या सीओएने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडशनिंग प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक या पदांसाठी हे अर्ज मागवले आहे. हे अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 जूलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
या प्रक्रियेसाठी सध्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ थेट पात्र आहेत. पण त्यांना पुन्हा त्यांच्या पदासाठी मुलाखत द्यावी लागणार आहे. त्यानंतर बीसीसीआय नवीन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती करणार आहे.
सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार विश्वचषकानंतर संपणार होता. पण त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे.
त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यासाठी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय संघाबरोबर कायम असतील.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘सिक्सर किंग’ ख्रिस गेल-युवराज सिंग आज येणार आमने-सामने
–२०११ विश्वचषकात ज्याच्या चेंडूवर धोनीने मारला होता विजयी षटकार तो होतोय निवृत्त
–प्रो कबड्डीत हा मोठा पल्ला पार करणारा तेलुगू टायटन्स केवळ दुसराच संघ