IPLक्रिकेटखेळाडूटॉप बातम्या

काय सांगता? विराट कोहलीच्या आरसीबीने रोहित शर्माच्या टीम इंडियाचा मोठा रेकॉर्ड मोडला, वाचा भन्नाट माहिती

सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 ची धामधूम सुरु आहेत. प्रत्येक सामन्यात काही नवे रेकॉर्ड बनत आहेत, काही जुणे रेकॉर्ड तुटत आहेत. अशात शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यानंतर टी20 क्रिकेटमधला एक मोठा विक्रम तुटला आहे. महत्वाचे म्हणजे विराट कोहलीच्या आरसीबी संघाने हा रेकॉर्ड तोडला आहे. आणि आरसीबीने ज्या संघाचा रेकॉर्ड तोडलाय, तो संघ आहे टीम इंडिया.

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने टीम इंडियाचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीच्या शतकामुळे टीम इंडियाचा विक्रम मोडला गेला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम हा भारतीय संघाच्या नावावर होता. परंतू आता हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या नावावर असणार आहे. ( Virat Kohli RCB Break Rohit Sharma Team India T20 Record  )

टीम इंडियाकडून आतापर्यंत 219 टी20 सामन्यात फलंदाजांनी 17 शतके झळकावली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून टी20 क्रिकेटमधला हा मोठा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. परंतू शनिवारी (दि. 6) राजस्थान आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात हा विक्रम मोडला गेला आणि आरसीबी संघाच्या नावावर झाला. टी20 क्रिकेटमध्ये 246 सामने खेळणाऱ्या आरसीबी संघाकडून त्यांच्या फलंदाजांनी आतापर्यंत 18 शतके झळकावली आहेत. विराटचे शतक हे आरसीबीकडून 18वे शतक ठरले. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये आरसीबी हा सर्वाधिक शतके झळकवणारा संघ ठरला आहे.

आरसीबी कडून विराट कोहलीने 8 शतके झळकावली आहेत. मनिष पांडेने 1, ख्रिस गेलने 5, एबी डिव्हिलियर्सने 2. देवदत्त पडिक्कलने 1 आणि रजत पाटीदारने 1 शतक झळकावले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर आहे. त्यानंतर 14 शतके झळकावत पंजाब किंग्स संघ दुसऱ्या स्थानावर, तर 14 शतके झळकावात राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहे.

अधिक वाचा –
– यश ठाकूर-क्रुणाल पांड्याचा जलवा! लखनऊचा गुजरातवर शानदार विजय
– जसप्रीत बुमराहचा किलर यॉर्कर! प्रयत्न करूनही पृथ्वी शॉ काहीच करू शकला नाही; पाहा VIDEO

– दिल्ली कॅपिटल्ससाठी आता प्लेऑफचा रस्ता कठीण, जाणून घ्या ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाची कारणं

Related Articles