---Advertisement---

राजस्थान 59 धावांवर Allout होऊनही विराट नाही खुश! म्हणाला, ‘मी बॉलिंग केली असती, तर फक्त…’

On: सोमवार, मे 15, 2023 4:46 PM
Virat-Kohli
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल 2023 स्पर्धेतील आपला 12वा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळला. रविवारी (दि. 14 मे) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर पार पडलेल्या आयपीएल 2023च्या 60व्या सामन्यात आरसीबीने केकेआरला 112 धावांनी पराभवाचा मोठा धक्का दिला. या विजयानंतर विराट कोहली याने त्याची अपूर्ण इच्छा व्यक्त केली. यावेळी तो म्हणाला की, “जर मी गोलंदाजी केली असती, तर ते 40 धावांवरच सर्वबाद झाले असते.”

राजस्थान विरुद्ध बेंगलोर (Rajasthan vs Bangalore) संघात खेळल्या गेलेल्या या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 171 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाचा डाव अवघ्या 10.3 षटकात 59 धावांवर संपुष्टात आला. ही आयपीएलच्या उद्घाटनाचा चॅम्पियन असलेल्या राजस्थान संघाची दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. तसेच, एकूण आयपीएल स्पर्धेतील तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली.

आरसीबीचे गोलंदाज शानदार लयीत
सामन्यानंतर आरसीबी (RCB) संघाने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) म्हणताना दिसला की, “जर मी गोलंदाजी केली असती, तर ते 40 धावांवर सर्वबाद झाले असते.”

या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज भलत्याच लयीत होते. संघाकडून वेगवान गोलंदाज वेन पार्नेल याने 3 षटकात फक्त 10 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स आपल्या नावावार केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. ब्रेसवेल याने 3 षटकात 16 धावा खर्च केल्या, तर कर्णने 1.3 षटकात 19 धावा खर्च केल्या. तसेच, स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज यानेही 2 षटकात 10 धावा खर्च करत 1 विकेट नावावर केली. तसेच, ग्लेन मॅक्सवेल यानेही 1 षटकात 3 धावा खर्च करून 1 विकेट घेतली.

आरसीबीच्या प्ले-ऑफच्या आशा कायम
राजस्थानसंघाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत आरसीबी संघाने प्ले-ऑफच्या आशा पुन्हा जागवल्या आहेत. जर आरसीबीने हा सामना गमावला असता, तर संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असता. या विजयानंतर संघाचे 12 सामन्यात 12 गुण झाले आहेत. आता संघाला पुढील दोन्ही सामने जिंकून प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता येऊ शकतो. जर संघाने एकही सामना गमावला, तर त्याना स्पर्धेबाहेर होण्यापासून गत्यंतर नाही. (virat kohli react after ipl 2023 after wining against rajasthan royals)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
भारतीय दिग्गजाने सांगितले IPL 2023मधील सर्वोत्तम फिनिशरचे नाव, समोर कुणीही असो बॅटमधून ओकतो आग
बॉलबॉय ते सीएसकेचा ट्रम्पकार्ड असा प्रवास करणारा तुषार देशपांडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---