---Advertisement---

प्रत्येक संघाकडे रहाणेसारखे प्रामाणिक खेळाडू नसतात; तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयाबद्दल विराटचे विधान

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 8:56 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (१८ मार्च) पार पडलेल्या चौथ्या ची२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ८ धावांनी विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने ही मालिका २-२ ने बरोबरीत आणली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना वादग्रस्तपणे बाद दिल्यामुळे, पंचगिरीवर टीका केली जात आहे. अशातच कर्णधार विराट कोहली यानेही संताप व्यक्त केला आहे.

सूर्यकुमार यादवने आपल्या टी -२० कारकिर्दीतील पहिल्याच डावात अर्धशतक झळकावले आहे. ५७ धावांवर फलंदाजी करत असताना त्याने लेग साईडच्या दिशेने चेंडू टोलवला तो चेंडू सरळ डेव्हिड मालनच्या हातात गेला. अंपायरने त्याला बाद घोषित केले. परंतु, मोठ्या स्क्रीन वर पाहिले असता स्पष्ट दिसून येत होते की, तो चेंडू जमिनीला लागला आहे. तरीदेखील अंपायरने त्याला बाद घोषित केले.

त्यांनतर शेवटच्या षटकातदेखील वॉशिंग्टन सुंदरने थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला चेंडू आदिल रशीदच्या हातात गेला. परंतु झेल घेत असताना त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला होता. तरीही अंपायरने त्याला बाद घोषित केले.

विराट कोहलीने व्यक्त केला संताप
या वादग्रस्त निर्णयानंतर विराट कोहली म्हणाला, “मला नाही माहित की अंपायरकडे ‘मला समजले नाही’ असा एक पर्याय का नाहीये. हे अंपायर कॉलसारखेच आहे. हे निर्णय असे आहेत जे सामना बदलू शकतात. मुख्यतः अशा मोठ्या सामन्यांमध्ये.”

प्रत्येक संघाकडे रहाणेसारखे प्रामाणिक खेळाडू नसतात 
पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहली म्हणाला, “तिसऱ्या अंपायरबद्दल बोलायचं झालं तर, कसोटी मालिकेतील एक घटना आठवण करून देतो. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी अजिंक्य रहाणे जवळ उभा होतो. त्याने सफाईने झेल टिपला होता. तरीसुद्धा आम्ही तिसऱ्या अंपायरकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. अर्धवट गोष्ट अशी असते की, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला पण त्याला शंका आहे. परंतु हे संभवच नाही की, स्क्वेयर-लेगचा अंपायर स्लिपमध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाचा झेल इतक्या सहजरीत्या पाहू शकेल. अंपायदरद्वारा योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे. कारण प्रत्येक संघाकडे रहाणेसारखे प्रामाणिक खेळाडू नसतात.”

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितच्या कॅप्टन्सीची कमाल! शेवटच्या ४ षटकात घेतले धाडसी निर्णय अन् ‘असा’ फिरवला सामना

सोशल मीडिया पोस्टमुळे संकटात सापडले ‘हे’ क्रिकेटर; एकावर तर झाली होती १ वर्षाची बंदी

शार्दुल विरुद्ध खेळताना आर्चरची तुटली बॅट अन् ‘ते’ ट्विट झालं व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---