---Advertisement---

‘बीसीसीआयचा विराटवर कसलाही दबाव नव्हता, पण…’, बीसीसीआय कोषाध्यक्ष धुमाळांचे स्पष्टीकरण

On: सोमवार, जानेवारी 17, 2022 9:59 AM
virat-kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल ७ वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली होती.

त्याने लिहिले की, “प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो, हा माझ्या कसोटी कर्णधारपदाचा शेवट आहे..” या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच्या या निर्णयावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. दरम्यान बीसीसीसायचे खजिनदार अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी देखील मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव

अरुण धुमाळ यांनी न्यूज ९ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “बीसीसीआय (BCCI) किंवा निवडकर्त्यांनी विराट कोहलीवर कर्णधारपद सोडण्यासाठी कुठलाही दबाव टाकला नव्हता. हा पूर्णपणे त्याचा निर्णय होता. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. परंतु त्याने आणखी २, ३ वर्ष संघाचे नेतृत्व करायला हवे होते.” दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. (Arun Dhumal statement)

तसेच अरुण धुमाळ यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “यात काहीच शंका नाही की, विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याला फलंदाज म्हणून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की त्याचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याने भारतीय क्रिकेट यापुढेही चांगली कामगिरी करत राहील.”

तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)  यांनी म्हटले की, “कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणे हे विराटचा वैयक्तिक निर्णय आहे.” विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी विराटला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकल्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात चांगलाच वाद रंगला होता.

महत्वाच्या बातम्या :

VIDEO: क्रिकेटजगतात झाले ‘बेबी एबी’चे आगमन; भारताविरुद्ध दाखवला फलंदाजीचा ट्रेलर

गावसकरांना रोहित नव्हे तर ‘या’ शिलेदारात दिसतोय भावी कसोटी कर्णधार, कारणासहित सांगितले नाव

हे नक्की पाहा:

विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव। Kohli thanks Dhoni-Shastri

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---