---Advertisement---

क्या बात है! स्वत: विराटनेच केली पत्नी अनुष्काच्या ‘त्या’ भूमिकेची प्रशंसा; पाहा काय म्हणाला

On: शुक्रवार, मे 21, 2021 4:01 PM
---Advertisement---

क्रिकेट आणि बॉलिवूड हे नाते नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूडमध्ये झळकलेल्या अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधली आहे. यातील सध्या नेहमीच चर्चेत असणारी जोडी म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या विराटने अभिनेत्री अनुष्का शर्मासह २०१७ साली लग्न केले. आता त्यांना ४ महिन्याची मुलगी देखील आहे. विराट क्रिकेटजगतातील एक उत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो, तर अनुष्कानेही आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. नुकतेच विराटने त्याला अनुष्काने साकरलेली त्याची आवडती भूमिका कोणती, याबद्दल खुलासा केला आहे.

विराटने सांगितले आहे की ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट त्याला आवडतो. या चित्रपटात अनुष्कासह रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय देखील होते. विराटने सांगितले की त्याला त्या चित्रपटात अनुष्काने साकारलेली भूमिका त्याची सर्वात आवडती भूमिका आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला, ‘ऐ दिल है मुश्किल, नेहमीच आवडती राहिल. मला आत्तापर्यंतची तिची सर्वात आवडलेली ती भूमिका होती. म्हणजे मी अजूनही तिला हे सांगत असतो. कधी कधी मी जेव्हा युट्यूब उघडतो तेव्हा मी तो सीन पाहातो, जेव्हा तिला कॅन्सर असतो आणि रणबीर परत येतो. ते गाणे माझ्या मनात कोरले गेले आहे.’

विराट आणि अनुष्का गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अखेर त्यांनी २०१७ साली इटलीमध्ये जाऊन लग्नगाठ बांधली. त्यांना यावर्षी ११ जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तिचे नाव त्यांना वामिका ठेवले आहे. विराट आणि अनुष्का बऱ्याचदा सोशल मीडियावरही त्यांचे अनेक प्रेमळ फोटो शेअर करत असतात. विराट नेहमीच अनुष्काच्या कामाचे कौतुक करत असतो, तर अनुष्काही वेळ मिळेल तेव्हा सामन्यांच्या दिवशी मैदानावर विराटला प्रोत्साहन देण्यासाठी हजेरी लावत असते.

सध्या विराटसमोर आता इंग्लंड दौऱ्याचे आव्हान आहे. त्याला पहिल्या वहिल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करायचे आहे. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्पटनला न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाचे ‘महागुरु’ म्हणून द्रविड नव्हे तर शास्त्री आहेत श्रेष्ठ, आकडेवारी पाहून पटेल खात्री

सातत्याने दुर्लक्षित होत असलेल्या कुलदीपला कट्टर विरोधक पाकिस्तानी संघाच्या दिग्गजाने दिला ‘पुनरागमनाचा मंत्र’

रोहितच्या पत्नीचे विराटशी होते खास नाते, सिनेमा थिएटरबाहेर एकत्र दिसल्याने झाली होती खूप चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---