बुधवारी मोहाली येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. तसेच 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. विराटने या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार 3 षटकार मारले. विराटच्या या शानदार कामगिरीनंतर त्याला दुसऱ्या टी20 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हा सामना संपल्यानंतर प्रझेंटेशनमध्ये विराट त्याच्या कामगिरीतील सातत्याबद्दल खूलासा करताना म्हणाला, ‘माझ्या शर्टवर हा जो भारताचा बॅज आहे त्यामुळे मला प्रेरणा मिळते. माझ्या देशासाठी खेळण्याचा मला अभिमान आहे.’
‘कोणत्याही क्रिकेट प्रकारात मला चांगली कामगिरी करण्यासाठी जे करावे लागेल ते मी करतो. तूमच्यात संघाला जिंकवण्याची मानसिकता पाहिजे. जर तूम्हाला तूमच्या संघाला जिंकवायचे असेल तर तूम्हाला मार्ग मिळेल. हीच महत्त्वाची गोष्ट आहे. मी माझा विचार करत नाही. मी नेहमी संघाला कशाची गरज आहे त्याचा विचार करतो.
विराटने या सामन्यात अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे. विराटने आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 71 सामन्यात 50.85च्या सरासरीने 2441 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर विराटची पुन्हा एकदा टी20मध्ये फलंदाजीची सरासरी 50 पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी, वनडे आणि टी20 प्रकारात प्रत्येकी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची सरासरीने असणारा सध्याचा एकमेव क्रिकेटपटू आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पाकिस्तानचा हा माजी कर्णधार म्हणतो ‘विराट तू खरंच दिग्गज खेळाडू आहेस’
–रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला पण केला हा मोठा विक्रम
–आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचलेला होता इतिहास, पहा व्हिडिओ






