---Advertisement---

डिविलियर्सचा ‘तो’ व्हॉईस मॅसेज ऐकून कोहली झाला होता भावूक, सांगितला इमोशनल किस्सा

Virat Kohli and AB de Villiers
---Advertisement---

आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू झाला आहे. मात्र या हंगामादरम्यान आयपीएलप्रेमींना एका दिग्गज क्रिकेटपटूची उणीव भासत आहे. तो क्रिकेटपटू अजून कोणी नसून एबी डिविलियर्स आहे. डिविलियर्सने नोव्हेंबर २०२१ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने डिविलियर्सविषयी मोठा खुलासा केला आहे. डिविलियर्सने व्हॉईस मॅसेज पाठवत विराटला आपल्या निवृत्तीची माहिती दिली होती. हे ऐकून डिविलियर्सचा जवळचा मित्र असलेला विराट भावूक झाला होता. 

विराटने (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी, RCB) एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मला आठवण आहे, जेव्हा डिविलियर्सने (AB De Villiers) क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला (AB De Villiers IPL Retirement) होता. त्याने मला एक व्हॉईस मॅसेज पाठवला होता. त्यावेळी मी टी२० विश्वचषक झाल्यानंतर भारतात परत येत होतो. आम्ही दुबईमध्ये होतो आणि तेव्हा मला त्याचा व्हॉईस मॅसेज मिळाला. अनुष्काही त्यावेळी माझ्यासोबत होती. डिविलियर्सचा मॅसेज ऐकून मी चकित झालो होतो आणि मी अनुष्काकडे पाहात राहिलो.”

पुढे बोलताना विराट म्हणाला की, “नंतर माझ्या चेहऱ्यावर निराशा पसरली. त्यानंतर मी त्याला अनुष्काला मॅसेज ऐकवला आणि ती मला म्हणाला, मला नको सांगू, मला आधीपासूनच सर्वकाही माहिती आहे. म्हणजे, अनुष्काला आधीपासूनच डिविलियर्सच्या निवृत्तीचा अंदाज होता.”

“मला मागील आयपीएलपासूनच या गोष्टीचा अंदाज होता. कारण डिविलियर्स सतत मला निवृत्तीबद्दल बोलत होता. तो मला म्हणत होता की, मला तुला असेच एका दिवशी कॉफीसाठी भेटायचे आहे. मी खूप नर्वस होत आहे. यावरून मला अंदाज आला होता की, काहीतरी होणार आहे. परंतु मी त्याला या विषयावर बोलायला गेलो की, तो विषय टाळायचा. पण नंतर अचानक त्याच्या निर्णयाबद्दल ऐकून मी खूप भावूक झालो होतो. माझ्या खूप साऱ्या आठवणी त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आम्ही एकत्र अनेक चढ-उतार पाहिले. तो नेहमी माझ्यासोबत राहिला आहे,” असे विराट म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘एका शब्दानेही RCBने मला विचारलं नाही, असं कुठं असतं का?’ अखेर ‘त्याची’ दुखरी बाजू जगासमोर

“आमच्यासाठी तोच बेबी एबी”, केएल राहुलकडून २२ वर्षीय भारतीय युवा खेळाडूचे कौतुक

‘तेवतिया म्हणजे क्रांती, समोरच्या टीममध्ये अशांती’, मॅचविनरचे कौतुक करताना ‘हा’ दिग्गज बनला कवी

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-

https://chat.whatsapp.com/BwXS4mmGcr33RyGkLOvfGT

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---