---Advertisement---

…म्हणून विराट कोहलीने २०१७नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणे सोडले

On: सोमवार, जून 3, 2019 4:24 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानात फलंदाजी करताना अनेक विश्वविक्रम केले आहेत. तसेच त्याच्या फलंदाजीवर भारतीय संघ बराच अवलंवूनही आहे. पण विराटच्या गोलंदाजीवर मात्र संघसहकाऱ्यांचा विश्वास नाही, याबद्दल खूद्द विराटनेच खूलासा केला आहे.

बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सवर विराटची एक मुलाखत प्रदर्शित करण्यात आली होती. या मुलाखतीत जतीन सप्रूने विराटला त्याच्या गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विराटने एक आठवण सांगितली आहे.

विराटने सांगितले की ‘2017 ला आम्ही श्रीलंकेत होतो आणि आम्ही जवळ जवळ सर्व सामने जिंकले होते. त्यावेळी शेवटचा वनडे सुरु होता. त्या सामन्यात एमएस धोनी म्हणाला, मधे 2-3 षटके गोलंदाजी करायची आहे, काय वाटते. तर मी म्हणालो मी टाकतो, म्हणून मी चेंडू हातात घेतला.’

‘पण त्याचवेळी लाँग ऑन उभ्या असणाऱ्या जसप्रीत बुमराहने विचारले ‘हे काय चालू आहे, ही काही मजा नाही हा आंतरराष्ट्रीय सामना आहे.’

‘मी नेटमध्ये गोलंदाजी करणे सोडून दिल्याने संघातील कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. पण माझा विश्वास आहे. त्यानंतर पाठीचा त्रास होत असल्याने मी गोलंदाजी केली नाही.’

‘मला पहिल्यापासूनच गोलंदाजी करायला आवडते. पण माझी गोलंदाजीची शैली खूप खराब आहे. लहान असताना कोणी काही बोलत नव्हते पण मी थोड्या मोठ्या स्तरावर गोलंदाजी करायला लागल्यावर लोकांना माझी गोलंदाजी मजेशीर वाटायला लागली. मग मला थोडे विचित्र वाटू लागले आणि मी 2-3वेळी गोलंदाजी करताना घसरलोही आहे.’

असे असले तरी काही दिवसांपूर्वी भारतीय संघ 2019 विश्वचषकातील पहिल्या सामन्यासाठी सराव करत असताना विराटने नेटमध्ये काही वेळ गोलंदाजी केली होती. त्यामुळे तो या विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसणार का याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.

त्याने याआधी 227 वनडे सामन्यांपैकी 48 सामन्यात गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी20 मध्येही विराटने 4 विकेट्स घेतल्या आहेत.

विराटने या मुलाखतीत इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनप्रमाणे त्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सांगितले आहे. त्याबद्दल तो म्हणाला, ‘मी जेम्स अँडरसनप्रमाणे दिल्लीत माझ्या अॅकॅडमीमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायचो.’

‘नंतर मला त्याच्याबरोबर भारताचा कर्णधार म्हणून खेळण्याची संधी मिळाली. मी त्याला ही कहानी सांगितली. त्यावर आम्ही दोघेही हसत होतो.’

व्हिडिओ – विश्वचषकाआधी विराटने नेटमध्ये गोलंदाजी सराव केला-

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, भारताविरुद्ध खेळणार नाही हा मोठा खेळाडू

वाढदिवस विशेष: सुलतान ऑफ स्विंग – वसीम अक्रम

विश्वचषक २०१९: भारत, पाकिस्तानलाही जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment