रणजी ट्रॉफी 2024-25 पूर्वी मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली बऱ्याच दिवसांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. असे झाल्यास विराट कोहली तब्बल 12 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करेल. याआधी तो रणजी ट्रॉफी 2012-13 हंगामात दिल्लीकडून शेवटची स्पर्धा खेळला होता. त्यानंतर विराट कोहलीचे नाव रणजी ट्रॉफी 2019-20 हंगामासाठी दिल्लीच्या संघात समाविष्ट करण्यात आले. मात्र तो खेळला नाही. आता तब्बल 12 वर्षांनंतर तो या स्पर्धेत खेळताना दिसणार असल्याचे मानले जात आहे.
याआधी देखील विराट कोहली दुलीप ट्राॅफी स्पर्धेत खेळू शकतो अशी अटकळ बांधली जात होती. मात्र तो शेवटच्या क्षणी खेळला नाही. आता विराट बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय विराट कोहलीबाबत कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही. याबाबत साशंकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली कदाचित पहिल्या हाफमध्ये खेळणार नाही. पण तो दुसऱ्या हाफमध्ये खेळू शकतो. अशी शक्यता आहे.
DDCA announced their Ranji Trophy Probables Today. The U23 teams will be selected from the below mentioned players only.
Indian Test team members Virat Kohli and Rishabh Pant have been included in the list of players as well, first time since 2019. pic.twitter.com/oiQ0ZGYCf3
— CricDomestic (@CricDomestic_) September 24, 2024
डीडीसीएने 84 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या यादीत विराट कोहलीशिवाय रिषभ पंत आणि हर्षित राणा यांचं नाव आहे. पण इशांत शर्माचं नाव नाही. यासंदर्भात डीडीसीएचे म्हणणे आहे की, बहुतांश खेळाडू आंतरराष्ट्रीय ड्युटीवर आहेत. यानंतर खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
हेही वाचा-
AUS vs ENG: 304 धावा करूनही कांगारू हरले, पाहा ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी ‘इंग्लंड’ची मोठी खेळी; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची निवृत्ती मागे
मायदेशी पोहचताच शाकिब अल हसनला अटक होणार? बीसीबीने दिला मोठा अपडेट






