मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. टाईम नियतकालिकेने काल प्रसिद्ध केलेल्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
विराट कोहलीबरोबर अभिनेत्री दीपिका पादुकोण, ओला कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल, जन्माने भारतीय असलेले मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचा या यादित समावेश आहे.
विराटबरोबर केवळ तीन खेळाडूंचा या यादित समावेश आहे. त्यात महान टेनिसपटू राॅजर फेडरर, क्लोअ कीम आणि केविन दुरंट यांचा समावेश आहे.
ही यादी जाहिर करताना ज्यांची नावे या यादीत आहे त्यांच्याबद्दल अभिप्राय नोंदवण्यात आले. विराट कोहलीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने तर दिपिकासाठी विन डिजेलने अभिप्राय नोंदवला आहे.
सचिन आपल्या अभिप्रायात म्हणतो, १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात २००८साली मी विराटला भारतीय संघाचे नेतृत्व करताना पाहिले. त्याच्यामध्ये असलेली धावांची भूक आणि खेळातील सातत्य यामुळे त्याने आपली एक स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याने विंडीज दौऱ्यानंतर स्वत:च्या खेळात तसेच फिटनेसमध्ये खुप बदल केला. क्रिकेटमधील तो एक मोठा खेळाडू आहे. मी त्याला भविष्यातील योजनांसाठी शुभेच्छा देतो. तसेच त्याने भारताचे नाव असेच रोषण करत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
काय म्हणाला सचिन विराटबद्दल…. pic.twitter.com/aqizWmxLNt
— Sharad Bodage (@SharadBodage) April 20, 2018
विराटनेही ट्विट करत मास्टर ब्लास्टर सचिनचे आभार मानले आहेत.
Thank you @sachin_rt paaji for such warm and encouraging words. Truly honored for being able to make it to the @Time's 100 list. #Times100 #grateful 🙏😇
— Virat Kohli (@imVkohli) April 20, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
- मुलीच्या वाढदिवसाला गेलची शतकरूपी खास भेट!
- पुणेकर चाहत्यांची होऊ शकते निराशा, हा खेळाडू उद्याच्या सामन्यात खेळणार नाही
-
विराट-रैनामध्ये कोण आहे टी२०चा खरा किंग?
-
तब्बल २२ संघांकडून क्रिकेट खेळलेला तो महारथी कोण?
-
विराट कोहली जगातील पहिल्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये
-
विरेंद्र सेहवागचा धक्कादायक खुलासा, आयपीएलमध्ये केवळ माझ्यामूळे हे घडले