आशिया चषक (Asia Cup) 2022चा चौथा सामना भारत विरुद्ध हाँगकाँग (INDvsHK) यांच्यात रंगला. बुधवारी (31 ऑगस्ट) दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी विशेष खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. या सामन्यात दोघांनी नाबाद अर्धशतके केली आहेत. लागोपाठ दोन सामन्यांमध्ये विराटने अधिक धावा केल्याने तो फलंदाजीच्या लयीत परतला आहे. असे असताना त्याने गोलंदाजीतही कमाल केली.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने हाँगकाँग विरुद्ध गोलंदाजी केली. तो सहा वर्षानंतर टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत होता. या सामन्यात भारताच्या नियमित गोलंदाजांनी जेमतेम कामगिरी केली. यावेळी काहींनी खूपच चांगली तर काहींनी निराशाजनक गोलंदाजी केली. विशेष म्हणजे विराटने उत्तम गोलंदाजी केली. त्याने सहाच धावा दिल्या.
उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज विराटने डेथ ओवर्समध्ये गोलंदाजी केली आहे. त्याने 17वे षटक टाकताना 6 धावा दिल्या तर त्यातील एक चेंडू निर्धाव होता. डेथ ओवर्समध्ये पार्ट टाइम गोलंदाजी करणे ही मोठी गोष्ट आहे. त्यातच टी20 प्रकारामध्ये कमी धावा देणे हे तर विशेष ठरते. विराटने ते करून दाखवले आहे.
सहा वर्षानंतर विराटने केली आतंरराष्ट्रीय टी20मध्ये गोलंदाजी
विराटने या सामन्याआधी 2016मध्ये गोलंदाजी केली होती. तेव्हा तो चांगलाच महागात पडला होता, मात्र त्याने विकेटही घेतली होती. त्याने 2016 टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिज विरुद्ध गोलंदाजी केली. तेव्हा त्याने 1.4 षटकात 15 धावा देत 1 विकेट घेतली होती. त्यातील 4 निर्धाव चेंडू, एक चौकर आणि एक षटकार होते.
मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये पाच वर्षानंतर गोलंदाजी
मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये विराटला गोलंदाजी करून 5 वर्षे झाली आहेत. त्याने 2017मध्ये श्रीलंका विरुद्ध वनडे सामन्यात गोलंदाजी केली होती. त्याने वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20मध्ये प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या आहेत.
https://twitter.com/_C_S___/status/1565025558605352965?s=20&t=k70kjFe-3TvSaLUwJG0rLw
हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात विराटने गोलंदाजीआधी फलंदाजीत चमक दाखवली. त्याने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20मधील 31वे अर्धशतक ठरले. तर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने आंतरराष्ट्रीय टी20मधील त्याचे सहावे अर्धशतक करताना नाबाद 68 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची भागीदारीही रचली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळी घातलेला वाद, आता तोच विराट आपल्यापुढे नतमस्तक झाल्याचे पाहून सूर्यकुमार म्हणतोय…
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
सूर्याच्या वादळी खेळीचे गुपित समजले! म्हटला ‘ही’ गोष्ट मी आधीच ठरवून येतो