भारताने आतापर्यंत दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. आता टीम इंडिया 2025 मध्ये पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या स्पर्धेच्या इतिहासात तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही बनला आहे. त्याने शिखर धवनचा 701 धावांचा विक्रम मागे टाकला. पण विराटच्या तुलनेत, सर्वकालीन महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया?
सर्वप्रथम, सचिन तेंडुलकरबद्दल बोलायचे झाले तर, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी कारकिर्दीत एकूण 14 डावांमध्ये फलंदाजी करताना 441 धावा केल्या. या स्पर्धेत तेंडुलकरचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही, त्याची सरासरी फक्त 36.75 होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या नावावर फक्त एक शतक आणि एक अर्धशतक आहे. तेंडुलकरचे हे एकमेव शतक त्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात झाले. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 141 धावांची दमदार खेळी केली.
दुसरीकडे, विराट कोहलीच्या बॅटने आयसीसी स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. त्याच्याकडे सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 16 डावांमध्ये 746 धावा आहेत. तो स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीच्या नावावर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक शतक आणि सहा अर्धशतके आहेत. जर कोहलीने उद्या 9 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 46 धावा केल्या तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 17 डावांमध्ये 791 धावा केल्या.
हेही वाचा-
IND vs NZ: टीम इंडियासाठी हे चार खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड, फायनलमध्ये किवींचा पराभव निश्चित?
आयपीएलची ताकद! पाकिस्तानचा क्रिकेटपटू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेऊन स्पर्धेत सामील होणार
CT 2025: टीम इंडियाचा ‘ब्रह्मास्त्र’ फायनलमध्ये न्यूझीलंडसाठी घातक ठरणार?






