इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला अटीतटीच्या सामन्याने सुरुवात झाली होती. आयपीएल २०२१ सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या तुफान फटकेबाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाला विजय मिळवण्यात यश आले होते. ग्लेन मॅक्सवेलला यावर्षीच्या लिलावात आरसीबी संघाने कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. आता कर्णधार विराट कोहलीने त्याच्या निवडीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
गतवर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेलला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाने त्याला रिलीज केले होते. त्यानंतर आयपीएल २०२१ लिलावात त्याला आरसीबी संघाने १४.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. यानंतर आता विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेलबद्दल मोठा खुलासा करत म्हटले आहे की, “आम्हाला फार पुर्वीपासून ग्लेन मॅक्सवेल आमच्या संघात हवा होता.”
तसेच तो पुढे म्हणाला, “मॅक्सवेल एक चांगला व्यक्ती आहे. जेव्हा मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा आमच्यात अनेकदा चर्चा झाली होती. तो आरसीबी संघात येऊन खूप आनंदी आहे. मला त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवत आहे. आम्हाला तो आमच्या संघात हवाच होता. फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात मॅक्सवेलला आमच्या संघात घेणे हे आमचे लक्ष्य होते. तसेच सर्व ठरल्याप्रमाणे घडलं तर नक्कीच तुम्हाला आनंद होतो.”
विराटने शेवटी सांगितले, “फिरकी गोलंदाज ॲडम झम्पा याने त्याची कॅपही ग्लेन मॅक्सवेलला भेट म्हणून दिली होती. यामुळेच लिलावाच्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल आरसीबीची कॅप घालून सराव करताना दिसून आला होता. हा फोटो झम्पाने मला सेंड केला होता. तो खूप मजेशीर स्वभावाचा खेळाडू आहे, त्यामुळे मी हे मजेशीररित्या घेतले होते. त्यांनतर मी ग्लेन मॅक्सवेलला मेसेज देखील केला होता.”
ग्लेन मॅक्सवेलने मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पहिल्या आयपीएल सामन्यात तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने अवघ्या २८ चेंडूत ३९ धावा केल्या होत्या. यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले होते. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल यंदा चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विकेट मिळेना म्हणून मोईन अलीचा रडीचा डाव, केलं असं काही की फलंदाजासह धोनीही चकित; पाहा व्हिडिओ
CSKvDC: खराब क्षेत्ररक्षण ते विकेट्सची कमी, ‘ही’ आहेत चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाची कारणे
बलाढ्य चेन्नईवर मात करण्यात ‘या’ खेळाडूंनी उचलला खारीचा वाटा; पाहा दिल्लीच्या विजयाचे नायक






