---Advertisement---

एकेकाळी दिसेल ते खाणारा, वेड्या माणसाप्रमाणे झोपणारा भारतीय खेळाडू आता झालाय सर्वात फिट, फक्त एका कारणामुळे झाले बदल

On: बुधवार, जुलै 29, 2020 8:04 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार विराट कोहली जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो त्याच्या फीटनेससाठीही जगभरात ओळखला जातो. विराट आपल्या फीटनेसबाबत खूप जागरूक आहे आणि तो त्याच्या खान-पानपासून व्यायामापर्यंत विशेष लक्ष देतो. विराटच्या कामगिरीमागे त्याच्या फीटनेसचे सर्वात मोठे योगदान आहे.

पण एक काळ असा होता, जेव्हा तो आपल्या फीटनेसवर अधिक लक्ष देत नव्हता. नुकतेच त्याने आपल्या त्या आयुष्याची आठवण काढली, जेव्हा त्याला जाणीव झाली होती की यशस्वी होण्यासाठी तो आवश्यक मेहनत घेत नाहीये.

नुकतेच भारतीय संघाचा खेळाडू मयंक अग्रवालबरोबर (Mayank Agarwal) चर्चा करताना विराट (Virat Kohli) म्हणाला की, आयपीएल २०१२ (IPL 2012) च्या मोसमानंतर तो स्वत:कडे पाहून निराश झाला होता आणि त्यानंतर त्याने निश्चय केला की तो ज्याप्रकारे ट्रेनिंग घेत आहे, त्यामध्ये बदल करेल. त्याने हेदेखील सांगितले की, जगातील सर्व संघांमध्ये विशेष म्हणजे ट्रेनिंगबाबत बदल होत होता. त्यावेळी भारतीय संघ फीटनेसबाबत त्यांच्यापासून खूप मागे होता, ही गोष्ट विराटला खूप चिंतेत टाकत होती.

विराटने सांगितले की, त्याचा डाएट किती वाईट होता आणि तो आयपीएलदरम्यान ४-५ दिवसांत तब्बल ४० चॉकलेट्स खात असायचा. तो म्हणाला, त्याच्यासमोर जे काही असायचे ते तो खात असायचा आणि खूप जास्त झोपायचा, त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता होती.

विराटसाठी आयपीएल २०११ चा हंगाम खूप चांगला राहिला होता आणि त्याने १६ सामन्यांमध्ये ५५७ धावा केल्या होत्या, तर पुढच्याच हंगामात म्हणजे २०१२ मध्ये १६ सामन्यांत त्याला ३६४ धावाच करता आल्या होत्या. २०१२ आयपीएल हंगामामध्ये केलेल्या कामगिरीनंतर विराटने आपल्या फीटनेसबाबत निश्चय केला आणि आपल्या डाएट तसेच ट्रेनिंगमध्ये बदल केला.

विराटने म्हटले, “आयपीएल २०१२ मध्ये केलेल्या कामगिरीने मला निराश केले आणि मी आपल्या फीटनेसवर लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्यासमोर जे काही यायचे ते मी खायचो. आम्ही अधिकतर आयटीसी गार्डेनियामध्ये थांबायचो. जिथे माझ्याकडे चॉकलेट्सचे पॅकेट असायचे, त्यामध्ये ४० चॉकलेट्स असायचे आणि मी ते ४-५ दिवसांत फस्त करायचो. त्यावेळी तेच माझे डाएट होते.”

“मी त्यावेळी वेड्या माणसाप्रमाणे झोपायचो कारण मला त्यावेळी यश मिळाले होते आणि सर्वकाही चांगले होत होते. मी आयपीएल खेळायला सुरुवात केली होती. तरीही २०१२ मोसमात केलेेल्या कामगिरीमुळे मला जाणीव झाली की मला आता बदल करण्याची आवश्यकता आहे. मी घरी परतलो आणि मला समजले की ज्याप्रकारे मी तयारी करत आहे, ते बदलण्याची आवश्यकता आहे. यानंतर मी दुसऱ्या दिवसापासून सर्वकाही बदलले,” असेही तो पुढे म्हणाला.

सध्या विराट आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १७७ सामने खेळले असून त्यात त्याने ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एलिसा पेरीच्या घटस्फोटनंतर का ट्रोल होतोय ‘हा’ भारतीय खेळाडू, घ्या जाणून

-हसीन जहानला येतेय ‘पिया की याद’; परंतु चाहते म्हणतात, शमी तर…

-पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला फोटो; चाहते म्हणतात, भाभी…

ट्रेंडिंग लेख-

-आरसीबीने आयपीएलमध्ये केल्यात सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावा; पहा बाकी संघ आहेत कोणत्या क्रमांकावर

-एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’….

-भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---