वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात विराट कोहली चांगल्या लयीत दिसला. पण अर्धशतकानंतर तो जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय फलंदाज अपेक्षित खेली करू शकले नाहीत. पण विराटने महत्वाच्या वेळी अर्धशतक केले आणि हंगामाचा शेवट सर्वाधिक धावांसह केला.
भारत आणि ऑस्ट्रेलि यांनी ग्रुप स्टेजच्या सामन्यांच्या शेवट गुणतालिकेत अनुक्रमे एक आणि तीन क्रमांक मिळवून केला. उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडला 70 धावांनी मात दिली, तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन विकेट्स राखून विजय मिळवला. अंतिम सामन्यासाठी हे दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने आल्यानंतर लढत रोमांचक होणार, यात शंका नव्हती. पण नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि हाच निर्णय महत्वाचा ठरला.
सलामीवीर शुबमन गिल अवघ्या 4, तर रोहित शर्मा 47 धावा करून बाद झाला. संघाला श्रेयस अय्यर (4) याच्या रुपात तिसरा झटका बसला. पहिल्या तीन विकेट्स संघाची धावसंख्या 81 अशताना पडल्या होत्या. पण विराट कोहली खेळपट्टीवर टिकून असल्यामुळे चाहत्यांना मोठ्या धावसंख्येचा विश्वास होता. विराटने 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली आणि कर्णधार पॅट कमिन्सने त्याला त्रिफळाचीत केले. विराटच्या विकेटनंतर भारतीय संघ अडचणीत आला, पण विराटसाठी विश्वचषकाचा हा हंगाम नक्कीच खास ठरला.
विराटने या हंगामात सर्वाधिक 765 धावांचे योगदान संघासाठी दिले. इतर एकही फलंदाज यावर्षीच्या विश्वचषकात 600 पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. यादरम्यानच्या 11 डावांमध्ये विराटची सरासरी 95.63 धावा राहिली. 6 अर्धशतक आणि 3 अर्धशतकांच्या जोरावर त्याने या धावा केल्या. त्यात उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध केलेले शतक, आणि अंतिम सामन्यातील अर्धशतक महत्वाचे ठरले. विराट एका विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. 2003 विश्वचषकात सचिनने 11 सामन्यांमध्ये 673 धावा केल्या होत्या.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड (World Cup 2023 IND vs AUS final Toss See playing XI Here)
महत्वाच्या बातम्या –
“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप
INDvsAUS Final: कहर! वर्ल्डकपमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा ‘किंग’ कोहली पहिलाच भारतीय, तुम्हालाही वाटेल अभिमान






