इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 चा दहावा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात बंगळुरू येथे सुरु आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या कोलकाता संघाला त्यांचा हा निर्णय चांगलाच जड गेल्याचे दिसून आले. सलामीला फलंदाजीला उतरलेल्या विराटने पहिल्या ओव्हरपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत किल्ला लढवला. विराटच्या वादळी आणि नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरू संघाने 182 धावांचा डोंगर उभा केलाय. त्यामुळे आता कोलकाताला जिंकण्यासाठी 183 धावांची गरज आहे. ( Virat Kohli scores an unbeaten 83 to take Royal Challengers Bengaluru to 182 for 6 against Kolkata Knight Riders in the Indian Premier League )
विराटने 59 चेंडूत 4 खणखणीत षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 83 धावांची खेळी केली. त्याला कॅमरून ग्रीनने 33 धावा, ग्लेन मॅक्सवेलने 28 दावा आणि दिनेश कार्तिकने 20 धावांची चांगली साथ दिली. विराटने कोलकाताच्या गोलंदाजांची पिसे काढत खणखणीत अर्धशतक झळकावले आणि आयपीएल 2024 ची ऑरेंज कॅप दिमाखात आपल्या डोक्यावर पुन्हा चढवली.
कोलकाताकडून मिशेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने 4 षटकात एकही विकेट न घेता 47 धावा दिल्या. तर सुनिल नरायण, वरून चक्रवर्ती यांनाही आरसीबीच्या फलंदाजांनी चांगलेच चोपले. कोलकाताकडून प्रत्येकी 2-1 बळी घेणाऱ्या आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी चांगली गोलंदाजी केली. आता कोलकाताला विजयासाठी 183 धावांचा डोंगर पार करावा लागणार आहे.
अधिक वाचा –
– न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार, उन्मुक्त चंदला मात्र स्थान नाही
– रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली चालू सामन्यात अंपायरशी भिडले, ‘या’ नियमावरून गोंधळ
– “येत्या 2 वर्षात तो भारतासाठी खेळेल”, रियान परागबाबत माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी