---Advertisement---

व्हिडीओ- कर्णधार विराट कोहली भडकला, थेट पंचांकडे केली जोफ्राच्या ‘त्या’ चुकीची तक्रार

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 6:50 PM
---Advertisement---

चेन्नई येथील सामन्याद्वारे भारत आणि इंग्लंड संघामधील बहुचर्चित ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात होते मात्र,पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा एकतर्फी पराभव केला. भारताच्या पराभवासोबतच विराट कोहलीच्या एका कृतीसाठी हा सामना कायम स्मरणात राहणार आहे.

घडले असे की, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चर फलंदाजी करत होता. यावेळी धाव घेताना आर्चरने थेट खेळपट्टीवर धावायला सुरुवात केली. याबद्दल विराटने नाराजी व्यक्त करत पंचांकडे या संदर्भात दाद मागितली. नियमानुसार कोणत्याही खेळाडूला खेळपट्टीच्या मधोमध धावण्यास परवानगी नसते. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Aragorn_2_/status/1358795280913559553?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1358795280913559553%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fsports-hindi%2Fvirat-kohli-seen-annoyed-as-jofra-archer-walk-on-pitch-while-taking-run-viral-video-4408076%2F

दरम्यान सामन्याचा विचार केला असता, येथे इंग्लंडने संपूर्ण सामन्यात शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मोठी निराशा केली. भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याआधी इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती.

महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर ४२० धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस  बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल फ्लॉप, एक-दोन नव्हे चक्क चौघे बोल्ड-आऊट 
बुढ्ढे में है दम! पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला अंडरसन अनेकार्थाने ठरलाय ऐतिहासिक खेळाडू
काय सांगता! पराभवाचे खापर फुटले रहाणेवर? माजी क्रिकेटपटूने रहाणेच्या फलंदाजीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
रोहित-विराटसारखे दिग्गज संघात असूनही टीम इंडिया का झाली पराभूत? जाणून घ्या पाच ठळक कारणं
इंग्लंड नडतेच, आजवर इतक्यांदा केलंय टीम इंडियाला मायभूमीत चितपट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---