अनुभवी फलंदाज विराट कोहली जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक ना एक गोष्ट शेअर करत आहे. भारतीय संघाला अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर कोहलीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. एक नवीन इन्स्टा स्टोरी शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्ट शेअर करत कोहलीने लिहीले की, ‘अॅलन वॉट्स’चे एक कोट शेअर केले. हे इंग्रजी कोट आहे. “परिवर्तनातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यात बुडणे, त्याच्याबरोबर चालणे आणि त्यात सामील होणे.” कोहलीने काही काळापूर्वी ही गोष्ट शेअर केली.
असा किस्सा यापूर्वी शेअर केला होता
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या (Australia) कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर, कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे एक कोट शेअर केला. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “शांतता हा महान शक्तीचा एक अद्भुत स्त्रोत आहे.”
Instagram story by Virat Kohli. pic.twitter.com/gYLt3FAtam
— Johns. (@CricCrazyJohns) June 15, 2023
कोहली अंतिम फेरीत अपयशी ठरला होता
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यामध्ये कोहलीने (Virat Kohli) आपल्या फलंदाजीने चाहत्यांना निराश केले होते. पहिल्या डावात तो 2 चौकारांच्या मदतीने 14 धावा काढून बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याने 7 चौकारांसह 49 धावा केल्या. मात्र, चौथ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करताना कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, त्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला.
यंदाची कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची कामगिरी
कोहलीने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 8 डावात फलंदाजी करताना त्याने 45 च्या सरासरीने 360 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 186 धावांची शतकी खेळी निघाली. विशेष म्हणजे, कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचही कसोटी सामने खेळले आहेत, चार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि एक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा





